१७ दिवसांपासून बेपत्ता पेंटरचा सांगाडाच सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 05:01 IST2020-08-26T05:00:00+5:302020-08-26T05:01:09+5:30

निखिलचा मोबाईल त्याच्या घरातच सापडला. त्यावर ‘मी कर्जाचा कंटाळून मरणाचा मार्ग स्वीकारत आहे’ असा संदेश आढळून आला. २३ ऑगस्ट रोजी निखिलचे शेजारी भाऊ राठोड यांनी चिंतामणी मंदिरासमोरील टेकडीवर वडसद जंगलात कोणी तरी मरून पडले असल्याची माहिती पंकज खाडे याला दिली. त्यावरून ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाची ओळख पटविली.

The skeleton of a painter who has been missing for 17 days has been found | १७ दिवसांपासून बेपत्ता पेंटरचा सांगाडाच सापडला

१७ दिवसांपासून बेपत्ता पेंटरचा सांगाडाच सापडला

ठळक मुद्देपुसद ग्रामीण : आत्महत्या की घातपात ?

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : पेंटींगचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणाऱ्या तरुणाचा सांगाडा कारला रोडवरील चिंतामणी मंदिराच्या टेकडीवर मंगळवारी आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा तरुण गेल्या १७ दिवसांपासून बेपत्ता होता.
निखिल बळीराम खाडे (२७) रा. महात्मा फुले सोसायटी कवडीपूर ता. पुसद असे मृत तरुणाचे नाव आहे. निखील ६ ऑगस्ट रोजी काहीही न सांगता घरुन निघून गेला होता. कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध करूनही त्याचा थांगपत्ता लागला नाही. त्याचा मोठा भाऊ पंकज याने ७ ऑगस्ट रोजी निखिल हरविल्याची तक्रार ग्रामीण पोलिसात दाखल केली होती.
दरम्यान निखिलचा मोबाईल त्याच्या घरातच सापडला. त्यावर ‘मी कर्जाचा कंटाळून मरणाचा मार्ग स्वीकारत आहे’ असा संदेश आढळून आला. २३ ऑगस्ट रोजी निखिलचे शेजारी भाऊ राठोड यांनी चिंतामणी मंदिरासमोरील टेकडीवर वडसद जंगलात कोणी तरी मरून पडले असल्याची माहिती पंकज खाडे याला दिली. त्यावरून ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाची ओळख पटविली.
यावेळी निखिलच्या मृतदेहाचे संपूर्ण मांस जनावरांनी खाल्ल्याचे दिसून आले. केवळ सांगाडा उरला होता व सांगाड्यावर पॅन्ट, शर्ट आणि गळ्यात दोरी अडकवलेली आढळून आली. पंकज खाडे याच्या तक्रारीवरून पुसद ग्रामीण पोलिसांनी तूर्तास अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पुसद उपजिल्हा रुग्णालयात आणला.
निखिलला आई-वडील नसून तो भाऊ व बहीण यांच्यासोबत राहत होता. ग्रामीणचे ठाणेदार संजय चौबे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय भाऊ वंजारे तपास करीत आहे.

Web Title: The skeleton of a painter who has been missing for 17 days has been found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू