दिग्रस शहरात सहा दिवसांआड मिळते पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST2019-12-24T05:00:00+5:302019-12-24T05:00:05+5:30

शहराला नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे पाणी पुरविले जाते. यात महिन्यातून केवळ पाच दिवसच पाणीपुरवठा होतो. सहा दिवसांआड नळ येतात. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. महिन्यातील पाच दिवसांच्या पाण्यासाठी पालिकेकडून १७० रुपये पाणी कर वसूल केला जातो.

Six days' supply of water in Digras city | दिग्रस शहरात सहा दिवसांआड मिळते पाणी

दिग्रस शहरात सहा दिवसांआड मिळते पाणी

ठळक मुद्देदुष्काळाचे सावट : नांदगव्हाण धरणाचे पुनर्निर्माण थंडावले, पालिकेची अनास्था

लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : शहराला सध्या सहा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. उन्हाळ्यात ही स्थिती भयावह होण्याची शक्यता आहे. परिणामी शहरावर दुष्काळाचे सावट घोंगावत आहे.
शहराला नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे पाणी पुरविले जाते. यात महिन्यातून केवळ पाच दिवसच पाणीपुरवठा होतो. सहा दिवसांआड नळ येतात. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. महिन्यातील पाच दिवसांच्या पाण्यासाठी पालिकेकडून १७० रुपये पाणी कर वसूल केला जातो. मात्र नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी पुरविण्यास पालिका अपयशी ठरत आहे. नगराध्यक्षांसह नगरसेवक उपाययोजना करीत नसल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.
यावर्षी तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शहरातील धावंडा नदीला एकही पूर गेला नाही. परिणामी शहर व तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा आहे. मात्र नगरपरिषदेच्या मालकी हक्काचे असलेल्या नांदगव्हाण धरणाची पुनर्बांधणी रखडली आहे. गेल्या १४ वर्षांपासून धरणाची पुनर्बांधणी सुरूच आहे. अद्यापही काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे शहरवासीयांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे. उन्हाळ्यात तर दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
नगरपरिषदेकडून गेल्या १४ वर्षांपासून नांदगव्हाण धरण पुनर्बांधणी सुरू असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे पालिकेच्या हलगर्जीपणानेच १४ वर्षांपूर्वी हे धरणे फुटले होते, असा जनतेचा आरोप आहे. ९ जुलै २००५ रोजी धरण फुटल्याने होत्याचे नव्हते झाले होते. महापुरात १२ निष्पाप बळी गेले होते. तेव्हापासून पुनर्बांधणी रखडली आहे. ‘सायफन’ पद्धतीचे हे धरण विना विजेने नगरपरिषदेच्या पाण्याच्या टाकीत पाणी पोहोचवत होते. आता धरणताच नाही, तर टाकीत पाणी कुठून येणार, असा प्रश्न आहे.

धरणातील गौण खनिजाची चोरी
नांदगव्हाण धरणातील गौण खनिज भर दिवसा चोरीस जात आहे. पुर्नबांधणीकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने चोरटे निर्धास्त झाले आहे. १२ कोटींचा निधी मिळूनही अद्याप काम पूर्ण झाले नाही. परिणामी धरणातून लाखो लीटर पाणी नाहक वाहून जात आहे. पुनर्बांधणीला आणखी किती वर्षे लागतील, असा प्रश्न जनतेला पडला आहे. शहरातील कृत्रिम पाणीटंचाई दूर करण्यासाठी आमदार संजय राठोड यांनी लक्ष देण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

Web Title: Six days' supply of water in Digras city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी