जिल्ह्यातील सात ठाणेदारांमध्ये फेरबदल

By Admin | Updated: May 29, 2017 00:47 IST2017-05-29T00:47:15+5:302017-05-29T00:47:15+5:30

जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी जिल्ह्यातील २८ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक

Shuffling of seven Thanedars in the district | जिल्ह्यातील सात ठाणेदारांमध्ये फेरबदल

जिल्ह्यातील सात ठाणेदारांमध्ये फेरबदल

प्रशासकीय बदली : २८ जणांचा समावेश
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी जिल्ह्यातील २८ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्यांची यादी जाहीर केली.
पोलीस अधीक्षक एम. राज कुमार रुजू झाल्यानंतर पहिल्यांदाच सार्वत्रिक बदल्यांची यादी जाहीर झाली. या यादीत २८ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. यवतमाळ शहरचे ठाणेदार नंदकिशोर पंत यांना आर्णीच्या ठाणेदारपदी, तर नियंत्रण कक्षातील बाळासाहेब खाडे यांना वडगाव रोडच्या ठाणेदारपदी नेमण्यात आले. नियंत्रण कक्षातील यशवंत बावीस्कर यांना यवतमाळ शहरचे ठाणेदार बनविण्यात आले. पांढरकवडाचे ठाणेदार गुलाबराव वाघ यांना जिल्हा विशेष शाखेत बसविण्यात आले. त्यांच्या जागी मुकुटबनचे ठाणेदार असलम खान यांना नियुक्ती दिली. आर्णीचे ठाणेदार संजय खंदाडे यांची राळेगावचे ठाणेदार म्हणून तर राळेगावचे ठाणेदार अरुण आगे यांची पोलीस कल्याण शाखेत बदली करण्यात आली.
वणी येथील उपजिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाबूसिंग राठोड यांना नियंत्रण कक्षात, तर नियंत्रण कक्षातील एपीआय प्रकाश राऊत यांना बिटरगाव ठाणेदार पदी नेमण्यात आले. यवतमाळ शहर ठाण्यातील संग्राम ताटे यांना वणी येथे वाहतूक शाखेत, एपीआय समाधान धंदरे यांची यवतमाळ ग्रामीणमधून घाटंजी, आर्णीचे एपीआय सतीश वळवी यांची दिग्रस, उमरखेडचे सदाशिव भडीकर यांची महागाव, पुसद शहरचे धीरज चव्हाण यांची तेथेच वाहतूक शाखेत बदली झाली. वणीच्या वाहतूक शाखेतील एपीआय विजय कसोधन यांची यवतमाळ शहर, कळंबचे संघरक्षक भगत यांची दारव्हा, नियंत्रण कक्षातील एपीआय उदय साळवी यांची कळंब येथे बदली झाली. याशिवाय पीएसआय संतोष मनवर, राहुल किटे, रंगनाथ जगताप, वसंत मडावी, संतोष माने, संजीव खंदारे, राजकिरण मडावी, रवी वाहुळे, राजू राऊत, यशवंत वाणी, विजय ढाके यांचीही बदली करण्यात आली. याशिवाय एक सहायक निरीक्षक व चार उपनिरीक्षकांची विनंती बदली झाली.

Web Title: Shuffling of seven Thanedars in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.