शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

बोरी महलचे चिमुकले वॉटर कपच्या लघु चित्रपटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 10:12 PM

गाव पाणीदार करण्यासाठी जिल्ह्यात गावागावात चुरस लागली असून वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून शेकडो हात श्रमदानात व्यस्त आहे. त्यांच्या या कार्यात चिमुकलेही मागे नाही. मोठ्यांचा आदर्श घेत चिमुकल्यांनी या स्पर्धेत खारीचा वाटा उचलला.

ठळक मुद्देआमीर खानकडून दखल : गाव पाणीदार करण्याचा संकल्प

गजानन अक्कलवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : गाव पाणीदार करण्यासाठी जिल्ह्यात गावागावात चुरस लागली असून वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून शेकडो हात श्रमदानात व्यस्त आहे. त्यांच्या या कार्यात चिमुकलेही मागे नाही. मोठ्यांचा आदर्श घेत चिमुकल्यांनी या स्पर्धेत खारीचा वाटा उचलला. याची माहिती सिनेअभिनेता आमीर खान यांच्यापर्यंत पोहोचली. चिमुकल्यांना भेटून त्यांचे मनोबलच वाढविले नाही तर आपल्या वॉटर कप स्पर्धेच्या लघु चित्रपटातही स्थान दिले. हे चिमुकले आहेत कळंब तालुक्यातील बोरी महलचे.कळंब तालुक्यात पाणी फाऊंडेशनच्यावतीने गावागावात वॉटर कप स्पर्धेसाठी श्रमदान सुरू आहे. दररोज श्रमदान करून गाव पाणीदार करण्याचा दृढ संकल्प गावकऱ्यांनी केला आहे. त्यांच्या या कार्यात बोरी महल येथील १४ ते २० वयोगटातील विद्यार्थीही सहभागी झाले. या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली ते कळंब तहसील कार्यालयात आयोजित पाणी फाऊंडेशनच्या प्रदर्शनातून. प्रदर्शन पाहून विद्यार्थ्यांनी आपले गाव पाणीदार करण्याचा निश्चिय केला. दर रविवारी गावात स्वच्छता अभियान राबविणे सुरू केले. त्यानंतर दैनंदिन अभियान राबविणे सुरू झाले. झाडे लावा उपक्रम हाती घेतला. एवढेच नाही तर चिमुकल्यांनी रोपवाटिकाही तयार केली. विद्यार्थ्यांची गँग आता शोषखड्डे तयार करण्यासाठी मार्गदर्शन करीत आहे. बंधाºयांची आखणी करून देण्यात विद्यार्थ्यांचा हातखंड झाला आहे. ढाळीचे बांध व इतर बंधारे तयार करण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. एवढेच नव्हेतर गावात गॅबियन स्ट्रक्चरचा बंधारा बांधण्यासाठी वर्गणी गोळा करून लोखंडी जाळी खरेदी केली. गावात यामुळे नवचैतन्य निर्माण झाले. पूर्वज डोंगरकरच्या नेतृत्वात यश निकुडे, आदर्श भानखेडे, चेतन भानखेडे, तेजस कांबळे, शिवम पंधरे, अभय राहाणहिरे, हेमंत चुनारकर, प्रज्वल शिवरकर, प्रशिक कांबळे, ओम पंधरे, सचिन शिवरकर, दुर्गेश रहाणहिरे, आकाश गायकवाड, रोशन निकुडे, चेतन निकुडे, अनिकेत निकुडे, अजय वाघाडे, मंगेश कांबळे, शुभम थूल, ज्ञान निकोडे, आशीष मेश्राम, यश चौधरी गाव पाणीदार करीत आहे. या सर्वांना मेकॅनिकल इंजिनिअर रवी राहणहिरे मार्गदर्शन करीत आहे. अभियंता असलेला हा तरुणही गावात श्रमदानासाठी तळ ठोकून आहे. बोरी महलच्या या विद्यार्थ्यांची महती पाणी फाऊंडेशनचे सर्वेसर्वा अभिनेता आमीर खान यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांनी या विद्यार्थ्यांना खंडाळा येथे भेटण्यास बोलावले. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या कार्याची प्रशंसा केली. एवढेच नाही तर लघु चित्रपटात सर्वांना स्थान दिले. काही भागाचे शूटिंग पूर्ण झाले आहे.अधिकाऱ्यांचे सक्रिय मार्गदर्शनवॉटर कप स्पर्धेसाठी कळंब तालुक्यातील गावागावात जावून उपविभागीय अधिकारी संदीप अपार व तहसीलदार रंजित भोसले मार्गदर्शन करीत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने प्रेरित होवून गावेच्या गावे स्पर्धेत सहागी होत आहे. आगामी काळात दुष्काळावर मात होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धा