घाटंजी स्टेट बँकेविरूद्ध शिवसेना आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 22:36 IST2018-09-13T22:35:36+5:302018-09-13T22:36:22+5:30
येथील स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेतील कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे गरजू शेतकऱ्यांना कृषी कर्ज मिळणे दुरापास्त झाले. यामुळे शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली.

घाटंजी स्टेट बँकेविरूद्ध शिवसेना आक्रमक
लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : येथील स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेतील कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे गरजू शेतकऱ्यांना कृषी कर्ज मिळणे दुरापास्त झाले. यामुळे शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली.
या शाखेत शेतकरी, ग्राहकांना असभ्य व हिन दर्जाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. याबाबत शाखा व्यास्थापक यांना भेटून उद्धट व ग्राहकांसोबत अरेरावी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी निवेदनातून केली.
तालुका संघटक सौरभ अवचित, विजय चव्हाण, वैभव निखाडे, रुपेश काटकर, सागर राठोड, पवन धडसे, उमेश श्रिपाधवार, महेश भोयर, मयूर भोयर, मधुकर सोनुले, निसार पठाण, विशाल कनाके, प्रकाश आडे, कुणाल कोडापे, आकाश टेकाम, अविनाश मोरे, रविकांत कोवे, राम चरडे, सुनील पलकडवार, कुणाल भोयर, शरद ठाकरे, रुपेश सोयाम, गणेश निमकर, श्रावण आत्राम, राजू विरदांडे, राहुल प्रधान आदींनी निवेदन दिले.