अकोला-बुलडाण्याला मंत्रिमंडळ विस्तारात स्थान नाही, शिवसेनेच्या खासदार भावना गवळी नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 08:40 PM2019-12-31T20:40:11+5:302019-12-31T20:41:44+5:30

शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांनी जाहीररीत्या नाराजी व्यक्त केली आहे. 

Shiv Sena MP bhawana Gawali disgruntled | अकोला-बुलडाण्याला मंत्रिमंडळ विस्तारात स्थान नाही, शिवसेनेच्या खासदार भावना गवळी नाराज

अकोला-बुलडाण्याला मंत्रिमंडळ विस्तारात स्थान नाही, शिवसेनेच्या खासदार भावना गवळी नाराज

Next

यवतमाळ : सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात अकोला, बुलडाणा जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांना स्थान दिले गेले नसल्याच्या मुद्द्यावर शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांनी जाहीररीत्या नाराजी व्यक्त केली आहे. 

खासदार गवळी यांचा नाराजी प्रकट करणारा व्हिडिओ वाशिम जिल्ह्याच्या रिसोडमधून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात बाजोरिया अथवा रायमुलकर यांना स्थान देऊन अकोला, बुलडाणा जिल्ह्याला प्रतिनिधित्व द्यावे, अशी एकमुखी मागणी सामूहिकरीत्या पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती. या मागणीला शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव, रायमुलकर, बाजोरिया, संजय गायकवाड, सेनेचे माजी आमदार तसेच शिवसेनेच्या पाचही जिल्ह्यातील प्रमुखांचे समर्थन असल्याचे भावना गवळी यांनी या व्हिडीओमध्ये सांगितले.

अकोला, बुलडाणा जिल्ह्यातील सेनेच्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्याबाबत पश्चिम विदर्भातील नेत्यांचे बहुमत असताना ‘मातोश्री’वरून हे बहुमत झुगारून  त्यांना स्थान दिले गेले नाही, उलट हे पद दुसरीकडे गेल्याने आपली जाहीर नाराजी असल्याचे खासदार गवळी यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. 

संतप्त प्रतिक्रिया
दरम्यान, गवळींच्या या व्हिडिओवर यवतमाळ जिल्ह्यात संतप्त प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाºया भावनातार्इंचा अकोला, बुलडाणा जिल्ह्यातील आमदारांसाठी आग्रह का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Web Title: Shiv Sena MP bhawana Gawali disgruntled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.