आश्रमशाळा शिक्षक व कर्मचाऱ्यांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 05:00 IST2019-11-17T05:00:00+5:302019-11-17T05:00:34+5:30

समाज कल्याण अंतर्गत आश्रमशाळेत कार्यरत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शनिवारी येथील समाज कल्याण कार्यालयासमोर धरणे दिले. तसेच समाज कल्याण सहायक आयुक्तांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघाच्या पुढाकारात हे आंदोलन करण्यात आले.

Shelter for Ashram school teachers and staff | आश्रमशाळा शिक्षक व कर्मचाऱ्यांचे धरणे

आश्रमशाळा शिक्षक व कर्मचाऱ्यांचे धरणे

ठळक मुद्देविविध मागण्या । समाज कल्याण आयुक्तांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : समाज कल्याण अंतर्गत आश्रमशाळेत कार्यरत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शनिवारी येथील समाज कल्याण कार्यालयासमोर धरणे दिले. तसेच समाज कल्याण सहायक आयुक्तांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघाच्या पुढाकारात हे आंदोलन करण्यात आले.
शासन निर्णयाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेऊन तत्काळ वेतननिश्चिती करून सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन अदा करावे, उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील प्राध्यापक व कर्मचाºयांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ त्वरित द्यावा, जिल्हास्तरावरील थकीत वेतन, वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकांना विना विलंब मंजूरी देऊन लाभ प्रदान करावा, सेवेत १२ वर्षे पूर्ण झालेल्या सर्व शिक्षकेतर कर्मचाºयांना कालबद्ध पदोन्नती लागू करावी, वसतिगृह अधीक्षक व वसतिगृह कर्मचाºयांना आश्रमशाळा संहितेप्रमाणे आठवडी सुटी जाहीर करावी आदी मागण्यांसाठी धरणे देण्यात आले.
या धरणे कार्यक्रमात जिल्हाभरातील ६०० हून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. प्रसंगी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. मागण्या मान्य न झाल्यास पुणे येथील संचालक कार्यालयावर धडक दिली जाईल, असा इशारा देण्यात आला. निवेदन देणाºया शिष्टमंडळाला अधिकाºयांनी प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले.
आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनावर कर्मचारी संघाचे विभागीय अध्यक्ष भूपाल राठोड, जिल्हाध्यक्ष जयदीप पवार, जिल्हा सचिव बंडू पवार, उपाध्यक्ष प्रमोद मुनेश्वर, गोपाल हिरवे, संघटक नामदेव चव्हाण, ज्ञानेश्वर गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Shelter for Ashram school teachers and staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक