शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

पुसद अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी शरद मैंद चौथ्यांदा बिनविरोध

By admin | Updated: June 29, 2017 00:13 IST

पुसद अर्बन को-आॅपरेटीव्ह बँकेच्या अध्यक्षपदी शरद आप्पाराव मैंद यांची चौथ्यांदा बुधवारी बिनविरोध फेरनिवड करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्क पुसद : पुसद अर्बन को-आॅपरेटीव्ह बँकेच्या अध्यक्षपदी शरद आप्पाराव मैंद यांची चौथ्यांदा बुधवारी बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. पुसद अर्बन बँकेच्या संचालकांची निवडणूक बिनविरोध पार पडली. त्यानंतर बुधवारी अध्यक्षपदासाठी जिल्हा उपनिबंधक गौतम वैर्धन यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक पार पडली. त्यात विद्यमान अध्यक्ष शरद मैंद यांच्याच सक्षम नेतृत्वावर विश्वास दाखवित संचालकांनी बँकेची धुरा पुन्हा त्यांच्याच खांद्यावर देण्याचा निर्णय एकमताने घेतला. त्यानंतर पुसदचे आमदार मनोहरराव नाईक स्वत: शुभेच्छा देण्यासाठी बँकेत पोहोचले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. शरद मैंद यांची कामगिरी पुसद अर्बन बँकेच्या ठेवी आज १५ वर्षानंतर एक हजार कोटीवर गेल्या आहे. ६०० कोटी एवढे कर्जवाटप व स्वनिधी ८१ कोटी तर नफा पाच कोटी आहे. सभासदांना नऊ टक्के डिव्हीडंड वाटप करण्यात येतो. राज्यात बँकेच्या ३६ शाखा आहेत. अर्बन बँकिंग क्षेत्रात सर्वप्रथम पुसद अर्बन बँकेने एटीएम सेवा सुरू केली. बँकेच्या प्रगतीत गेल्या १५ वर्षात सर्व संचालकांनी सहकार्य दिले. तसेच पुसद अर्बन बँकेने योग शिबिर स्वच्छ भारत अभियानांतर्गत डस्टबिनचे वाटप कुपोषित बालकांना दत्तक घेवून त्यांची तपासणी, औषध व संगोपन असे सामाजिक उपक्रमही राबविले. टंचाईच्या काळात १६ ठिकाणी पाच ते दहा हजार लिटरच्या टाक्या बसवून रोज एक लाख लिटर पाणी वाटप केले. वृक्षारोपणासह मागील वर्षी बिझनेस एक्सपो घेण्यात आला. सहा सिकलसेल रुग्णांना बँकेने दत्तक घेतले आहे. जलसंधारण कार्यशाळा घेतली. शहरात रेन हार्वेस्टिंग अभियान राबवून १५ कोटी लिटर पाणी संचय करण्यात आला. गरीब गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली. यापुढे बँकिंग क्षेत्रात स्पर्धा ‘टफ’ - शरद मैंद अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना शरद मैंद म्हणाले, अर्बन बँकिंग क्षेत्रात मोबाईल बँकिंग सेवा सुरू करणारी पुसद अर्बन को-आॅपरेटीव्ह बँक ही विदर्भ, मराठवाडा विभागात पहिली बँक आहे. तसेच डिजिटल बँकिंगमध्ये पुसद अर्बन बँकेचा अ‍ॅग्रेसिव्ह सहभाग आहे. आगामी पाच वर्ष बँकिंग इंडस्ट्रीजमध्ये टफ कॉम्पिटेशन राहणार आहे. ११ जानेवारी १९८६ साली पुसद अर्बन बँकेची स्थापना झाली. पूर्वी नाईक बंगल्यातून संचालकांची निवड होत असे. १९९१ साली पहिली निवडणूक बिनविरोध झाली. अध्यक्षपदी अ‍ॅड.आप्पाराव मैंद यांची निवड झाली. त्यांनी दहा वर्षे अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. २००२ पर्यंत बँकेत राजकारण होते. तेव्हा संचालकांचे सहकार्य अध्यक्षांना पूर्णपणे मिळत नव्हते. अध्यक्षांना तारेवरची कसरत करावी लागत होती. २००२ मध्ये मी अध्यक्षपदाची धुरा घेतली, तेव्हा बँकेची ठेव ८१ कोटी होती. १६ शाखा होत्या. कर्जवाटप ५५ कोटी होते. स्वनिधी आठ कोटी होता. नफा ५० लाख होता.