राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यात लावले बेशरमीचे झाड; अभिनव आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 16:49 IST2020-11-06T16:45:46+5:302020-11-06T16:49:03+5:30
हे खड्डे अपघातास निमंत्रण देत आहे तर शुक्रवारी ठीक 11.30 च्या सुमारास एक स्वीफ डिझायर गाडी खड्डयात हुसळली हा अपघात एवढा भयानक होता. परंतु सुदैवाने एअरबॅग बाहेर आल्यामुळे गाडीतील प्रवाशी बचावले.

राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यात लावले बेशरमीचे झाड; अभिनव आंदोलन
महागाव (यवतमाळ) : तालुक्यात असलेल्या हिवरा संगम येथुन गेलेल्या राष्ट्रीय महार्गावरील रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने दररोज येथे अपघात होतात आणि दिवसेंदिवस अपघात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. नागपूर बोरी तुळजापूर जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे काम सुरू असून हिवरा या गावावरून बायपास रस्ता गेल्याने ह्या बायपास रस्त्याचे काम बंद असून आई एकविरा देवीच्या मंदिराजवळील रस्त्यावर मोठं मोठे जीवघेणे खड्डे पडल्यामुळे या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना नागरिकांना संकटाचा सामना करावा लागत आहे.
हे खड्डे अपघातास निमंत्रण देत आहे तर शुक्रवारी ठीक 11.30 च्या सुमारास एक स्वीफ डिझायर गाडी खड्डयात हुसळली हा अपघात एवढा भयानक होता. परंतु सुदैवाने एअरबॅग बाहेर आल्यामुळे गाडीतील प्रवाशी बचावले. तर या खड्ड्याची संपूर्ण माहिती असताना सुद्धा संबंधित विभाग व रस्ते कंपनी याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत असल्यामुळे दिनांक 6 शुक्रवार रोजी स्वाभिमानी शेतकरी युवा संघटनेच्या वतीने संबंधित विभागाचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी युवा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राम जाधव यांच्या नेतृत्वाखाली खड्यात बेशरमीचे झाड लावून जाहीर निषेध नोंदवित अभिनव आंदोलन केले. यावेळी माजी सभापती गजानन कांबळे, सुनील बोकसे, सोहेल खान, दीपक काळे, विजय कदमसह स्वाभिमानी शेतकरी युवा संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.