शक्तिपीठ महामार्गाचे काम शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय करू नये; शेतकऱ्यांचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 18:05 IST2025-02-15T18:04:53+5:302025-02-15T18:05:58+5:30

Yavatmal : २ कोटी रुपये एकरी मोबदला देण्याची आहे मागणी

Shaktipeeth highway work should not be done without fulfilling farmers' demands; Farmers' protest | शक्तिपीठ महामार्गाचे काम शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय करू नये; शेतकऱ्यांचे आंदोलन

Shaktipeeth highway work should not be done without fulfilling farmers' demands; Farmers' protest

लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव :
पवनार ते पत्रादेवी (नागपूर ते गोवा) शक्तिपीठ द्रुतगती महामार्गाचे काम शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांची पूर्तता केल्याशिवाय सुरू करु नये या मागणीकरिता महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावर महागाव येथील भिसे पेट्रोल पंपाजवळ रास्ता आंदोलन केले.


शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता शेतकऱ्यांनी हातामध्ये फलक घेऊन रास्ता रोको आंदोलन केले. प्रति एकर दोन कोटी रुपये मोबदला द्यावा. शक्तिपीठ द्रुतगती महामार्गाच्या दोन्ही बाजूला शेतात ये-जा करण्यासाठी सव्हिस रोड द्यावा. शेतात जाण्यायेण्यासाठी जोड, शिवरस्ते, पांदण रस्ते तसेच वापरासाठी बोगदा किंवा उड्डाणपूल तयार करावा.


यांनी दिले निवेदन
अधिग्रहित जमिनीचा मोबदला अगोदर जाहीर करावा व तसा फलक प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात लावावा आदी मागण्या शेतकऱ्यांनी केल्या. आंदोलनात शेतकरी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष विशाल पवार, भगवान गावंडे, पंजाबराव राऊत, अरुण राऊत, प्रवीण नरवाडे, पंजाबराव शिंदे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते. तहसीलदार अभय मस्के, ठाणेदार धनराज निळे यांनी आंदोलकांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले

Web Title: Shaktipeeth highway work should not be done without fulfilling farmers' demands; Farmers' protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.