शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसला सर्वाधिक सात तालुके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 06:00 IST

शासकीय विश्रामभवनावर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत २१ जागांच्या वाटपावर चर्चा झाली. परंतु शनिवारी केवळ तालुका गटाच्या जागांबाबत निर्णय झाला. जिल्हा गट व आरक्षणाच्या जागांसाठी महाविकास आघाडीकडून इच्छुक उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली, काही नावांवर एकमतही झाले. परंतु अद्याप त्याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही.

ठळक मुद्देजिल्हा बँक निवडणूक । महाविकास आघाडीची बैठक, तीन तालुके तूर्त अनिर्णीत

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी शनिवारी महाविकास आघाडीच्या बैठकीत तालुका गटाच्या जागांचे वाटप करण्यात आले. त्यात सर्वाधिक सात जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत.शासकीय विश्रामभवनावर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत २१ जागांच्या वाटपावर चर्चा झाली. परंतु शनिवारी केवळ तालुका गटाच्या जागांबाबत निर्णय झाला. जिल्हा गट व आरक्षणाच्या जागांसाठी महाविकास आघाडीकडून इच्छुक उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली, काही नावांवर एकमतही झाले. परंतु अद्याप त्याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. २८ फेब्रुवारीला महाविकास आघाडीची पुन्हा बैठक होणार असून त्यात हा निर्णय घेतला जाणार आहे. १६ तालुका गटापैकी उमरखेड, आर्णी, यवतमाळ, बाभूळगाव, मारेगाव, वणी व राळेगाव या सात जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत. पुसद व महागाव राष्ट्रवादीकडे तर दिग्रस, नेर या जागा सेनेकडे आल्या आहेत.झरी, दारव्हा आणि कळंब आदी जागांवर एकमत होऊ शकले नाही. तेथे काँग्रेस सोबतच शिवसेनेनेही दावा सांगितला आहे. दारव्ह्याची जागा काँग्रेस नेत्याला मुलासाठी तर कळंबची जागा शिवसेना नेत्याला काकासाठी हवी असल्याने त्यावर निर्णय होऊ शकला नाही. परंतु आपसी तडजोडीने या दोन्ही जागांवर उपरोक्त दोन्ही पक्ष एकमेकाला सहकार्य करण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात आले. या बैठकीला सर्वच प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.निवडणूक कार्यक्रमाला मंजुरी, उपनिबंधक निर्णय अधिकारीदरम्यान २६ मार्च रोजी मतदान, २५ फेब्रुवारीपासून नामांकन, ४ एप्रिलला मतमोजणी या नियोजित निवडणूक कार्यक्रमाला राज्याच्या सहकार निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी मंजुरी दिली आहे. जिल्हा उपनिबंधक आर.एन. कटके यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

टॅग्स :bankबँकElectionनिवडणूक