एकाच रात्री सात आत्महत्या

By Admin | Updated: January 10, 2015 23:02 IST2015-01-10T23:02:31+5:302015-01-10T23:02:31+5:30

उमरखेड येथे चिमुकलीसह मातेने विहिरीत उडी घेऊन, जांभोरा येथे विवाहितेने जाळून घेऊन तर यवतमाळात दोन जणांनी तर उमरखेड तालुक्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.

Seven suicides on one night | एकाच रात्री सात आत्महत्या

एकाच रात्री सात आत्महत्या

हळहळ : दोन महिलांचा समावेश
यवतमाळ : उमरखेड येथे चिमुकलीसह मातेने विहिरीत उडी घेऊन, जांभोरा येथे विवाहितेने जाळून घेऊन तर यवतमाळात दोन जणांनी तर उमरखेड तालुक्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. एकाच रात्री जिल्ह्यात सात जणांनी आत्महत्या केल्याचे पुढे आल्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे.
ज्योती खंडू शिंदे (३२) रा.झाकीर हुसेन वॉर्ड, उमरखेड, रंजना अशोक ढेकले (२५) रा.जांभोरा ता.दारव्हा, मनोहर अर्जून शेजाळ (३४) रा.तिवरंग ता.उमरखेड, अतुल केशव माने (३२) रा.नाथनगर उमरखेड, प्रशांत संभाशिव चवलेवार (३६) रा.सुरजनगर यवतमाळ, अब्दुल मन्नान अब्दुल मस्तान (६५) रा.अलकबीरनगर यवतमाळ अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहे. तर वैष्णवी खंडू शिंदे (४) असे आईसोबत मृत्युमुखी पडलेल्या बालिकेचे नाव आहे.
उमरखेड येथील ज्योती खंडू शिंदे या विवाहितेने मुलगी वैष्णवी (४) हिच्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. दारूड्या नवऱ्याच्या जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याची तक्रार ज्योतीची आई रुक्माबाई पानपट्टे यांनी पोलिसात दिली. तिचा विवाह खंडू सोबत २००२ मध्ये झाला होता. खंडू हा खासगी वाहन चालक आहे. या दाम्पत्याला दोन मुली आणि एक मुलगा आहे. तो दारूच्या आहारी गेल्याने पत्नीला मारहाण करून त्रास देत होता. ज्योतीने माहेरी माहिती दिली होती. दरम्यान, शुक्रवार ९ जानेवारी रोजी ती आपली सर्वात लहान मुलगी वैष्णवी हिच्यासह निघून गेली. शोधाशोध करण्यात आली. परंतु ठावठिकाणा लागला नाही. शनिवारी सकाळी शहरानजीकच्या एका विहिरीत एका मुलीचे प्रेत तरंगताना आढळून आले. पोलिसांना माहिती देण्यात आली. शोध घेतला असता त्याच विहिरीत ज्योतीचेही प्रेत आढळून आले. पोलिसांनी पती खंडू शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दारव्हा तालुक्यातील जांभोरा येथे रंजना अशोक ढेकले (२५) या विवाहितेने शुक्रवारी रात्री १०.३० वाजता अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. त्यात ती ८० टक्के जळाली. त्यातच तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर शनिवारी दुपारपर्यंत पोलीस आले नव्हते. त्यामुळे दुपारी ४ वाजेपर्यंत तिचे प्रेत घरीच होते. रंजनाला तीन मुली आहे. मूळचा पाटणबोरीचा प्रशांत संभाशिव चवलेवार (३६) रा.सुरजनगर यवतमाळ याने मध्यरात्री विष घेऊन बसस्थानक चौकातील भारत लॉजमध्ये आत्महत्या केली. तर अलकबीरनगरातील अब्दुल मन्नान अब्दुल मस्तान (६५) यांनी गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास उजेडात आली.
(लोकमत चमू)

Web Title: Seven suicides on one night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.