शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

सिंचन घोटाळ्यात कंत्राटदारासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 16:00 IST

बनावट प्रमाणपत्राच्या आधारे मिळविले कंत्राट

यवतमाळ : राज्यातील सिंचन घोटाळ्याची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपविण्यात आली होती. यात जिल्ह्यातील महागाव कसबा ता.दारव्हा येथील मध्यम प्रकल्पाचे कंत्राट घेताना खोटे प्रमाणपत्र सादर केल्याचे तपासात सिद्ध झाले. या प्रकरणी एसीबीच्या तक्रारीवरून यवतमाळ शहर ठाण्यात कंत्राटदारासह पाटबंधारे विभागातील सात जणांविरुद्ध मंगळवारी रात्री गुन्हे दाखल करण्यात आले.

कंत्राटदार भास्कर सिद्धराम माने रा.प्रद्युम्न अपार्टमेंट भांडारकर रोड, शिवाजीनगर पुणे, संजय उत्तमराव काळभोर मु.कवडी पो.मांजरी ता.हवेली जि.पुणे या कंत्राटदारांविरुद्ध फसवणुकीसह खोटे दस्तावेज वापरल्याचा गुन्हा भादंवि कलम ४६५, ४६६, ४७१, ४७४, ४२०, ३४ नुसार दाखल केला आहे. तर खोटे कागदपत्र सादर करणाऱ्या अपात्र कंत्राटदाराला पात्र ठरवून निविदा दिल्याच्या आरोपात पूर्व अहर्ता पडताळणी समितीचे तत्कालिन मुख्य अभियंता मो.ई. शेख नागपूर, अकोला पाटबंधारे मंडळाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता एस.डी. कुलकर्णी, गोसेखुर्द प्रकल्पाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता ख.ल. खोलापूरकर, नाशिक येथील अधीक्षक अभियंता प्र.भ. सोनवने, यवतमाळचे तत्कालिन कार्यकारी अभियंता आर.एस. सोनटक्के या पाच जणाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ मधील १३ (१) (क) (ड), १३ (२) नुसार गुन्हे दाखल केले आहे. याप्रकरणी यवतमाळ एसीबीचे पोलीस निरीक्षक गजेंद्र क्षीरसागर यांनी तक्रार दिली आहे. 

महागाव लघु पाटबंधारे प्रकल्पाची (ता.दारव्हा) निविदा सूचना २००७-०८ मध्ये प्रसिद्ध झाली. हे काम मिळविण्यासाठी यशश्री कंत्राटदार व मे. स्वामी समर्थ इंजिनिअर्स अ‍ॅन्ड संजय काळभोर असोसिएशन (जेव्ही) पुणे यांनी पूर्व अहर्ता कागदपत्रांसोबत अनुभव प्रमाणपत्रावर खोटी माहिती भरली. खोटे प्रमाणपत्र तयार करून ते खरे भासवून निविदा प्रक्रियेत भाग घेतला. हे कंत्राट खोट्या कागदपत्राच्या आधारे प्राप्त केले. पाटबंधारे विभागातील कागदपत्र पडताळणी समितीने योग्यरित्या कागदपत्रांची पडताळणी न करता पात्रता नसलेल्या कंत्राटदारांना कंत्राट देवून लाभ पोहोचविला, असा ठपका एसीबीकडून ठेवण्यात आला आहे. सातपैकी एकाच प्रकरणात शासनाची मान्यता

सिंचन घोटाळ्यात खोट्या कागदपत्राच्या आधारे कंत्राटदारांनी कामे लाटली. त्याला पाटबंधारे विभागातील यंत्रणेकडूनही सहकार्य मिळाले. अशा सात प्रकरणांचा तपास एसीबीकडे आला होता. त्याची चौकशी करून शासनाकडे अहवाल पाठविण्यात आला. मात्र यापैकी एकाच प्रकरणात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची परवानगी एसीबीला मिळाली आहे.

टॅग्स :YavatmalयवतमाळIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिस