Seven killed in Yavatmal district; 199 Newly corona positive | यवतमाळ जिल्ह्यात सात जणांचा मृत्यू ; १९९ नव्याने पॉझेटिव्ह

यवतमाळ जिल्ह्यात सात जणांचा मृत्यू ; १९९ नव्याने पॉझेटिव्ह

ठळक मुद्देजिल्ह्यात २६३ जणांची कोरोनावर मात

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्ड तसेच विविध कोव्हीड केअर सेंटर व कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेले २६३ बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर गत २४ तासात जिल्ह्यात नव्याने १९९ पॉझेटिव्ह आले असून सात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

मृत झालेल्यांमध्ये सहा पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार सद्यस्थितीत जिल्ह्यात ११९४ अ‍ॅक्टिव्ह पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये २७४ जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ५४४९ झाली आहे. यापैकी ३८३५ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात १४५ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात २८७ जण भरती आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत ६११२५ नमुने पाठविले असून यापैकी ५८८३९ प्राप्त तर २२८६ अप्राप्त आहेत. तसेच ५३३० नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

Web Title: Seven killed in Yavatmal district; 199 Newly corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.