शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

शासकीय कामांसाठी सात घाट राखीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2022 5:00 AM

उमरखेड तालुक्यातील विडूळ येथे शेतातील कामे आटोपून सायकलने घराकडे परतत असलेल्या मुकिंदा लक्ष्मण मुनेश्वर यांना देवसरी ते विडूळ रस्त्यावर रेती तस्करी करणाऱ्या भरधाव टिप्परने पाठीमागून येवून जोरदार धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या पुलाजवळ घडली.  टिप्पर  चालकाला महसूल विभागाचे वाहन मागावर  येत असल्याची खबर मिळाल्याने त्याने मुख्य रस्ता सोडून डाव्या कालव्याच्या रस्त्याने टिप्पर टाकला. त्यात हा अपघात घडला.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य शासनाच्या नव्या अध्यादेशानुसार ज्या रेती घाटांचा लिलाव होणार नाही अशा स्वरूपाचे रेती घाट शासकीय कामकाजासाठी राखीव ठेवण्याच्या सूचना आहेत.  त्यानुसार जिल्ह्यात सात रेतीघाट शासकीय कामकाजासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. यामुळे शासकीय बांधकामांना गती मिळणार असली तरी जिल्ह्यात रेतीअभावी घरकुलाची हजारो कामे रखडल्याने सर्वसामान्यांचे मात्र हाल सुरू आहे.  जिल्ह्यात सात रेती घाट लिलाव प्रक्रियेतून विकल्या गेले नाही. अशा रेत घाटांना आता शासकीय कामकाजासाठी राखीव ठेवले आहे. यामध्ये बाभूळगाव तालुक्यातील वर्धा नदीच्या पात्रातील सौजना, बेंबळा प्रकल्पातील वाटखेड, राळेगाव तालुक्यातील वर्धा नदीच्या पात्रातील धर्मापूर, कळंब तालुक्यातील वर्धा नदीच्या पात्रातील औरंगपूर, उमरखेड तालुक्यातील पैनगंगा नदीच्या पात्रातील चालगणी, झरी जामणी तालुक्यातील पैनगंगा पात्रातील हिरापूर, आर्णी तालुक्यातील अडाण पात्रामध्ये येणाऱ्या आयता रेती घाटाला आरक्षित ठेवण्यात आले आहे. या रेती घाटाचे शासकीय मूल्य दोन कोटी २१ लाख ३४ हजार ६०० रुपये आहे. या ठिकाणी ३६ हजार ८९१ ब्रास रेती शिल्लक आहे.  

 घरकूल बांधताना सर्वसामान्यांची मात्र दमछाक - गतवर्षी घरकुलाच्या बांधकामामध्ये जनसामान्याला आधार मिळावा म्हणून रेती घाटातून रेती देण्यासंदर्भात निर्णय झाला होता. यावर्षी देखील रेती घाटामधून लाभार्थ्यांना रेती मिळाली तर घरकूल बांधताना लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे. रेती भाव आकाशाला भिडल्याने मोफत रेती मिळाली तर घरकूलधारकांचे घर बांधणे सोपे होणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन तशी तरतूद करण्याची आवश्यकता आहे. तरच आरक्षित रेतीघाट घरकूलधारकांना  मोलाची मदत करणारे ठरतील.

तस्करीने घेतला शेतकऱ्याचा बळी

उमरखेड तालुक्यातील विडूळ येथे शेतातील कामे आटोपून सायकलने घराकडे परतत असलेल्या मुकिंदा लक्ष्मण मुनेश्वर यांना देवसरी ते विडूळ रस्त्यावर रेती तस्करी करणाऱ्या भरधाव टिप्परने पाठीमागून येवून जोरदार धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या पुलाजवळ घडली. गावापासून ३०० मीटरवर ही घटना घडल्यामुळे काही क्षणातच घटनास्थळी मोठा जमाव जमा झाला. धडक दिल्याबरोबर चालक टिप्पर रस्त्यावर सोडून फरार झाला.  अपघाताची माहिती मिळताच उमरखेडचे ठाणेदार अमोल माळवे, उपनिरीक्षक प्रशांत देशमुख फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी  पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उमरखेडच्या सामान्य रुग्णालयात पाठविला. पोलिसांनी तातडीने कारवाई करीत टिप्पर पोलीस ठाण्यात जमा केला आहे. याप्रकरणी चालकाविरुद्ध भादंवि २७९/४अ, १३४, १७७ मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 

कर्मचाऱ्यांनीच टीप दिल्याचा आरोप- टिप्पर  चालकाला महसूल विभागाचे वाहन मागावर  येत असल्याची खबर मिळाल्याने त्याने मुख्य रस्ता सोडून डाव्या कालव्याच्या रस्त्याने टिप्पर टाकला. त्यात हा अपघात घडला.   काही महसूल कर्मचारीच अवैध वाहतूक करणाऱ्यांना टीप देत असल्याने अशा कर्मचाऱ्यांवर  सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विडूळ ग्रामस्थांनी केली आहे.

 

टॅग्स :sandवाळूSmugglingतस्करी