संवेदनशील विद्यार्थी काळाची गरज
By Admin | Updated: September 28, 2016 00:51 IST2016-09-28T00:51:59+5:302016-09-28T00:51:59+5:30
भारत हा शांतताप्रिय देश आहे. नवी पिढीही शांतताप्रिय आणि संवेदनशील घडविण्याची गरज आहे.

संवेदनशील विद्यार्थी काळाची गरज
चिंतामण वंजारी : अकरावी पुनर्रचित भाषा विषयाची कार्यशाळा
यवतमाळ : भारत हा शांतताप्रिय देश आहे. नवी पिढीही शांतताप्रिय आणि संवेदनशील घडविण्याची गरज आहे. ही जबाबदारी प्रामुख्याने शिक्षकांची आहे, असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी केले.
स्थानिक नारायण माकडे हायस्कूल व स्व. रामभाऊ ढोले विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात अकरावीच्या विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांसाठी कार्यशाळा पार पडली. यावेळी चिंतामण वंजारी कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. अमरावती विभागीय शिक्षण मंडळाच्या वतीने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. इयत्ता अकरावीच्या पुनर्रचित भाषा अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकाबाबत यावेळी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले.
कार्यशाळेला प्रमुख अतिथी म्हणून मराठी विषय अभ्यास मंडळ सदस्य डॉ. प्रा. माधुरी काळे (वर्धा), शिक्षण निरीक्षक चंद्रप्रकाश वाहणे, विज्युक्टाचे जिल्हाध्यक्ष प्रा. दत्तात्रय जयपूरकर, जिल्हा सचिव प्रा. प्रकाश लामणे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश भुमकाळे, प्राचार्य विजय सातपुते, तज्ज्ञ मार्गदर्शन प्रा. रमेश वाघमारे, प्रा. गणेश थोरात, प्रा. अशोक पाटील, प्रा. अरुण बुंदेले आदी उपस्थित होते. या कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शकांनी लेखन, गद्य व पद्य विभाग, व्यक्तिचित्र, उपयोजित मराठी व प्रश्नपत्रिकेच्या स्वरुपावर सखोल माहिती देण्यात आली.
यावेळी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील २०० शिक्षक उपस्थित होते. कार्यशाळेचे प्रास्ताविक चंद्रप्रकाश वाहणे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अशोक पांडे यांनी केले. तर आभार प्राचार्य विजय विसपुते यांनी मानले. कार्यशाळेच्य यशस्वितेसाठी प्रा. मेघा खालगोने, प्रा. नमिता चव्हाण, प्रा. भारती ढुके, प्रा. वैशाली लिंगायत, श्याम जतकर, रुपेश लोखंडे, अनिल गुल्हाने, बाबाराव मरस्कोल्हे, अंकुश जिरापुरे, रोशन बुटके आदींनी परिश्रम घेतले. (स्थानिक प्रतिनिधी)