शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

ज्येष्ठांनी दिला मंत्र, ‘पेपर वाचाल तरच वाचाल’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2020 5:00 AM

वृत्तपत्रांमधून कोरोना पसरत नाही, उलट ‘लोकमत’ सारखी वृत्तपत्रे वाचाल तरच वाचाल, असा संदेशच जणू हे अनुभवी जाणकार एकमेकांना देत आहे. स्वत:सह इतरांनाही जाणीवपूर्वक वृत्तपत्र वाचण्यास बाध्य करणारे हे ज्येष्ठ नागरिक ऐरेगैरे नसून पुसद पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि शेंबाळेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव आहेत.

ठळक मुद्देशेंबाळपिंपरीत विज्ञाननिष्ठ पाऊल : कोरोनाला हरविण्यासाठी ज्येष्ठ नागरिक वाचताहेत, वाटताहेत ‘लोकमत’

नंदकिशोर बंग ।लोकमत न्यूज नेटवर्कशेंबाळपिंपरी : वृत्तपत्रांच्या वाटपातून कोरोनाचा फैलाव होतो, अशी अनाठायी भीती जनमानसात पसरविण्यात आली होती. त्यातून काही दिवस वृत्तपत्रांची छपाई देखील बंद ठेवावी लागली होती. मात्र आता खुद्द वाचकांनीच वृत्तपत्रांचे मोल ओळखून सामूहिक वाचन सुरू केले आहे. पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरीतच एका ज्येष्ठ नागरिकाने चक्क स्वत:च ‘लोकमत’चे अनेक अंक विकत घेऊन अनेकांना वाटप करण्याचा विडाच उचलला आहे.वृत्तपत्रांमधून कोरोना पसरत नाही, उलट ‘लोकमत’ सारखी वृत्तपत्रे वाचाल तरच वाचाल, असा संदेशच जणू हे अनुभवी जाणकार एकमेकांना देत आहे. स्वत:सह इतरांनाही जाणीवपूर्वक वृत्तपत्र वाचण्यास बाध्य करणारे हे ज्येष्ठ नागरिक ऐरेगैरे नसून पुसद पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि शेंबाळेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव आहेत. या जुन्या जाणत्या व्यक्तिमत्वाचे रवींद्र महल्ले हे नाव पंचक्रोशित सर्वपरिचित आहे, ते त्यांच्या सुधारणावादी वर्तनामुळेच. त्या सुधारणेचेच हे एक पुढचे पाऊल.रवींद्र महल्ले हे परिसरातील ज्येष्ठ गरजू नागरिकांना दररोज स्वखर्चाने ‘लोकमत’ वृत्तपत्र वितरित करीत आहे. कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे सारा देश हवालदिल झालेला आहे. या विषाणूमुळे ज्येष्ठ नागरिकांचाच अधिक बळी घेतला आहे. त्यामुळे ज्येष्ठांमध्ये एक प्रकारे दहशतीचे वातावरण आहे. या भीतीपायी अनेकांनी वृत्तपत्रे वाचणे सोडून दिले होते. मात्र त्यांच्या मनातील भीती घालविण्यासाठी तसेच त्यांना विरंगुळा मिळावा या हेतूने रवींद्र महल्ले यांनी वृत्तपत्र वाचनाचा उपक्रम सुरू केला आहे. वृत्तपत्रातून जीवदान मिळविण्याचा मार्ग मिळेल असा कृतीशिल संदेश महल्ले यांनी दिला.‘लोकमत’ परिवाराकडून दखललॉकडाऊनच्या काळात इच्छा असूनही अनेकांपर्यंत वृत्तपत्र पोहोचणे कठीण झाले आहे. वाचनाचा ध्यास असलेले अनेक ज्येष्ठ नागरिक दररोज वृत्तपत्रांसाठी तळमळत आहे. अशा ज्येष्ठांची निवड करून रवींद्र महल्ले यांनी वृत्तपत्र वितरणाचा उपक्रम सुरू केला.

टॅग्स :Lokmatलोकमत