प्रतिबंधित कपाशीचे वाण जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 05:00 IST2020-06-08T05:00:00+5:302020-06-08T05:00:13+5:30

झाडकिन्ही येथे काही लोकांकडून प्रतिबंधित बीजी-३ वाण विक्री केले जात असल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाला मिळाली. त्यावरुन धाड टाकण्यात आली. यावेळी विक्रम खोंडे यांच्याकडून ३७९, देवीदास परचाके यांच्याकडून २४ तर देवेंद्र डुकरे यांच्याकडून १६ पाकिटे जप्त करण्यात आली. विजया, जेके-७७७, सिकंदर, रागवा, काव्या या नावाची ही पाकिटे ताब्यात घेतली.

Seized varieties of restricted cotton | प्रतिबंधित कपाशीचे वाण जप्त

प्रतिबंधित कपाशीचे वाण जप्त

ठळक मुद्दे४१९ पाकिटे सापडली : झाडकिन्ही येथे धडक कारवाई, तिघे ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब/डोंगरखर्डा : तालुक्यातील झाडकिन्ही येथे कपाशीच्या प्रतिबंधित बियाण्यांची ४१९ पाकिटे जप्त करण्यात आली. ही धडक कारवाई कृषी विभागाने रविवारी दुपारी थेट गावात जाऊन केली.
झाडकिन्ही येथे काही लोकांकडून प्रतिबंधित बीजी-३ वाण विक्री केले जात असल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाला मिळाली. त्यावरुन धाड टाकण्यात आली. यावेळी विक्रम खोंडे यांच्याकडून ३७९, देवीदास परचाके यांच्याकडून २४ तर देवेंद्र डुकरे यांच्याकडून १६ पाकिटे जप्त करण्यात आली. विजया, जेके-७७७, सिकंदर, रागवा, काव्या या नावाची ही पाकिटे ताब्यात घेतली. विक्रम खोंडे, देवीदास परचाके व देवेंद्र डुकरे यांना ताब्यात घेण्यात आले.
विशेष म्हणजे कारवाई सुरू असताना त्यांच्या नातेवाईकांकडून अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु पोलिसांच्या मदतीने कृषी विभागाने कारवाई केली.
कळंब ठाण्यात तक्रार देण्यात आली असून कारवाईची प्रक्रिया सुरु करण्यात आली. सदर कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पंकज बरडे, मोहीम अधिकारी राहुल डाखोरे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक दत्तात्रय आवारे, तालुका कृषी अधिकारी प्रतीभा कुताळ, पंचायत समितीच्या कृषी अधिकारी सोनाली चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक राज साळवे यांच्या पथकाने केली.

सोयाबीनचे काय ?
कृषी विभागाने कपाशीच्या बियाण्यांबाबत मोहीम सुरू केली आहे. मात्र सोयाबीन बियाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण करून ते जादा भावात विकले जात आहे. सोयाबीन बियाण्याबाबत मात्र कृषी विभागाकडून एकही कारवाई का केली जात नाही, हा प्रश्न आहे.

Web Title: Seized varieties of restricted cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.