शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

दारुबंदीसाठी आमदारांना घेराव

By admin | Updated: June 4, 2016 02:12 IST

यवतमाळ जिल्ह्यात दारुबंदी करण्याचे आश्वासन अनेक लोकप्रतिनिधींकडून देण्यात आले.

कळंबमध्ये रोष : महिलांनी मांडली कैफियत, ठाणेदारांना सूचनाकळंब : यवतमाळ जिल्ह्यात दारुबंदी करण्याचे आश्वासन अनेक लोकप्रतिनिधींकडून देण्यात आले. यामध्ये आमदार डॉ.अशोक उईके यांचाही समावेश होता. परंतु अजूनही दारुबंदीसाठी ठोस पावले उचलली गेली नाही. आमदार डॉ.उईके यांना शुक्रवारी स्वामिनी समितीच्या सदस्यांनी येथे घेराव करून जाब विचारला.आमदार डॉ.उईके यांनी हिवाळी अधिवेशात दारुबंदीसाठी निघालेल्या मोर्चाप्रसंगी उपस्थित राहून समर्थन दिले होते. यावेळी अनेक महिलांनी आमदार डॉ.उईके यांच्यासमोर येत आपली कैफीयत मांडली. कोणत्या गावात दारु सुरु आहे, पोलीस दारुवाल्यांकडून कसे पैसे घेतात, त्यामुळे अवैध दारु विक्रेत्यांची गावात कशी दादागिरी वाढली आहे, दारुमुळे कुटुंबाची कशी वाताहत झाली, याची माहितीही यावेळी महिलांनी दिली. मोर्चाचे नेतृत्व महेश पवार व मनीषा काटे यांनी केले. सागर मून, अशोक उमरतकर, सुषमा गाढवे, नामदेव टेकाम, भारती गोल्हर, शोभा गावंडे, पुष्पा कठाडे, आशा कोमटी, संजीवनी कासार, सुनीता रायमल, सुनीता तिवस्कर, अनिता गावंडे, चंदा कंकाले, नंदा वाडेकर, राजश्री मोहुर्ले, अलका मेश्राम, मंगला चुनारकर, वर्षा कुटे, मंदा धरणेकर, मालती डेरे, ज्योती गांवडे, सुनीता मोहुर्ले, मोहिनी पांडे, साधना लोणबळे, दीपा अजमिरे, संजय मोरे, मंदा उमरे, उषा मडावी, सुनीता राहुलकर, माया पोहाणे आदी महिला घेराव आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, आमदार डॉ.उईके यांनी ठाणेदार बी.जी. कऱ्हाळे यांना तत्काळ पाचारण केले. महिला काय म्हणतात, हे ऐकावयास सांगितले. त्यानंतर ठाणेदारांना विश्राम भवन येथे बोलावून गावातील अवैध दारु तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले. (तालुका प्रतिनिधी)