शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
2
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
3
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
4
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
5
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
6
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
7
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
8
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
9
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
10
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
11
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
12
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
13
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
14
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
15
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
16
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
17
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
18
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
19
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
20
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!

राज्यात दुसरी ते पाचवीचा अभ्यासक्रम बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 14:22 IST

पहिलीचा अभ्यासक्रम बदलल्यानंतर आता दुसरी ते पाचवी या वर्गांचा अभ्यासक्रमही नव्या स्वरूपात येणार आहे. यातील दुसरीचा नवा अभ्यासक्रम २०१९-२० या सत्रापासूनच लागू होणार असून त्यापुढील प्रत्येक वर्गाचा अभ्यासक्रम दरवर्षी बदलणार आहे.

ठळक मुद्देबालभारतीची तयारीअभ्यासक्रम पुनर्रचना समितीसाठी १५४ जणांची निवड

अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पहिलीचा अभ्यासक्रम बदलल्यानंतर आता दुसरी ते पाचवी या वर्गांचा अभ्यासक्रमही नव्या स्वरूपात येणार आहे. यातील दुसरीचा नवा अभ्यासक्रम २०१९-२० या सत्रापासूनच लागू होणार असून त्यापुढील प्रत्येक वर्गाचा अभ्यासक्रम दरवर्षी बदलणार आहे.या संदर्भात महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती) नवीन अभ्यासक्रमाच्या रचनेसाठी तयारी सुरू केली आहे. दुसरीचा अभ्यासक्रम लगेच बदलविण्याचा निर्णय झाल्याने या संदर्भात अभ्यासक्रम पुनर्रचना व पाठ््यपुस्तक निर्मिती समितीसाठी राज्यातील १५४ जाणकारांची निवडही करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी आठवीचा नवा अभ्यासक्रम लागू करताना बालभारतीने निवडक तज्ज्ञांची समिती गठित केली होती. तर पहिलीचा नवा अभ्यासक्रम या समितीने अवघ्या दीड महिन्यात ‘फायनल’ केल्याची माहिती आहे.ही बाब लक्षात घेता केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने अभ्यासक्रम पुनर्रचना समितीसाठी राज्यभरातून प्रस्ताव मागविण्याची सूचना केली होती. या सूचनेनुसार राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक स्तरावरील १५४ शिक्षकांना समितीसाठी पाचारण करण्यात आले आहे. आता बालभारतीचे संचालक डॉ. सुनील मगर यांच्या उपस्थितीत पुणे येथे १ ते ३ आॅगस्टदरम्यान या तज्ज्ञ शिक्षकांची कार्यशाळा होणार असून त्यातूनच दुसरी ते तिसरीच्या नव्या अभ्यासक्रमाचा आराखडा ठरणार आहे.समितीत विदर्भातील ३९ जणबालभारतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यातील १५४ तज्ज्ञ शिक्षकांनी अभ्यासक्रम पुनर्रचना समितीत सहभाग घेतला. यात विदर्भातील ३९ जणांचा समावेश आहे. यवतमाळातून चार, चंद्रपूर एक, भंडारा एक, अमरावती पाच, बुलडाणा चार, नागपूर नऊ, गडचिरोली एक, अकोला सात, वाशिम एक, वर्धा एक तर गोंदियातून पाच शिक्षक या समितीत आहेत. आता पुण्यातील कार्यशाळेदरम्यान यातील काही जणांची नावे गळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र