शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
2
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश
3
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
4
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
5
'या' मॉडेलला आता आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागणार; ग्लॅमरस ते खुनी 'असा' होता प्रवास
6
पाकला पाठिंबा देणाऱ्या चीनला भारताने शिकवला धडा; ड्रॅगनला ५ वर्षे सहन करावा लागणार तोटा
7
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३२,०४४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
9
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
10
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
11
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
12
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
13
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
14
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
15
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
16
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
17
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
18
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
19
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
20
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...

वाघाचा दरीमध्ये शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 23:26 IST

वाघ दिसल्याची आरोळी एका शेतकºयाने ठोकली. गुरगुरला अन् दरीत शिरल्याचा दावाही त्याने केला. जीवाची भीती असली तरी एकदाचा छडा लाऊच या जिद्दीने लोकांनी दरी गाठली.

ठळक मुद्देप्रधानबोरीत दहशत : शेतकरी, शेतमजूर धास्तावलेले, बंदोबस्ताची मागणी

निश्चल गौर ।लोकमत न्यूज नेटवर्कडोंगरखर्डा : वाघ दिसल्याची आरोळी एका शेतकºयाने ठोकली. गुरगुरला अन् दरीत शिरल्याचा दावाही त्याने केला. जीवाची भीती असली तरी एकदाचा छडा लाऊच या जिद्दीने लोकांनी दरी गाठली. तीन तास ठिय्या देऊनही वाघ बाहेर आला नाही. सोबतीला असलेल्या वनविभागाच्या पथकालाही आल्यापावली परत जावे लागले. वाघाच्या दहशतीने झोप उडालेल्या प्रधानबोरीत (ता.कळंब) हा प्रकार घडला.प्रधानबोरी परिसरातील जंगल परिसरात तीन ते चार ठिकाणी दरीसदृश मोठे खड्डे आहेत. त्यात वन्य जीवांचे वास्तव्य असल्याचे सांगितले जाते. प्रधानबोरी येथील भोन्या आया टेकाम यांच्या शेतालगतच्या डोंगर पायथ्याशी असलेल्या दरीमध्ये वाघ असल्याची चर्चाही वेगाने गावात पसरली. ही माहिती मिळताच वनविभागाच्या पार्डी बीटचे वनरक्षक जी.व्ही. घाटे, पहूर बीटचे वनरक्षक आर.एन. काटोळे, चौकीदार विश्वास धानोरकर यांनी गावकºयांना सोबत घेऊन दरी गाठली. या ठिकाणापासून जवळच अंतरगाव धरण आहे. तेथे पाणी पिण्यासाठी गुरे येतात. शिवाय लगतच शेती आहे. वाघाने जनावरे ठार मारल्याचीही घटना या भागात घडल्या आहे. ज्या ठिकाणी वाघ दिसल्याचे सांगितले जाते, त्या दरीची पाहणीही करण्यात आली. बराचवेळ प्रतीक्षा केल्यानंतरही असा कुठलाही प्रकार त्याठिकाणी आढळला नाही.घटनास्थळाचा पंचनामा करून वनविभागाच्या चमूने माहिती घेतली. दरीमध्ये वन्य श्वापद आहे असे काही लोकांकडून ठामपणे सांगितले जात होते. परंतु वनविभागाच्या चमूला काहीही सापडले नाही.