शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एसडीओंना निवेदन
By Admin | Updated: September 30, 2016 02:53 IST2016-09-30T02:53:52+5:302016-09-30T02:53:52+5:30
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विदर्भ शेतकरी संघटनेच्यावतीने विविध

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एसडीओंना निवेदन
विदर्भ शेतकरी संघटना : शेतमालाला योग्य भाव देण्याची मागणी
पुसद : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विदर्भ शेतकरी संघटनेच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांना देण्यात आले.
यंदा नदी-नाल्यांचे पाणी शेतात शिरल्याने पिकांच्या झालेली नुकसानभरपाई देण्यात यावी, शेतमालाच्या उत्पादन खर्चावर आधारित भाव देण्यात यावा, शेतकऱ्यांना निवृत्तीवेतन देण्यात यावे, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील व्यक्तीस शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावे, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, वन्य प्राण्यांकडून झालेली शेतमालाची नुकसानभरपाई देण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी विदर्भ शेतकरी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मणराव जाधव, कार्याध्यक्ष भवरसिंह सिसोदिया, उपाध्यक्ष पंडित गादेवार व युनुस शेख, सचिव विजय उबाळे, सहसचिव नागोराव सुरोशे, कोषाध्यक्ष शंकर गावंडे, सहसचिव दिलीप कुबडे, सदस्य भीकाजी दळवी, राजेंद्र वाकोडे, बालाजी बासटवार, मच्छिंद्रनाथ चिन्नावार, माधव पडघणे, डॉ. ओ.पी. काकण, भारत पेन्शनवार, अरविंद उपलेंचवार, सुभाष पापीनवार, हनवंतराव शिंदे, अशोक बाबर, राजू साळुंके, रंगराव सुरोशे, घनश्याम दुधे, शंकर चव्हाण यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येन उपस्थित होते. (प्रतिनिधी)