शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
2
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
3
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
4
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
5
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
6
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत
7
Hyundai IPO: दिग्गज कार कंपनी आणणार देशातील सर्वात मोठा IPO, लिस्टिंगचा आहे प्लान
8
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
9
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
10
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
11
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
12
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
13
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
14
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
15
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
16
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
18
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
19
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
20
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या

ऑनलाईन कामात शाळा माघारल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2019 3:21 PM

शालेयस्तरावर राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांसाठी प्रत्येक शाळेची इत्यंभूत माहिती यू-डायस प्लस पोर्टलवर भरण्याचे आदेश आहे. मात्र महाराष्ट्रातील एक लाख दहा हजार शाळांपैकी अद्याप ५० टक्के शाळांनीही माहिती भरलेली नाही.

ठळक मुद्देयू-डायस प्लस ५० टक्के शाळांनीही भरली नाही माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शालेयस्तरावर राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांसाठी प्रत्येक शाळेची इत्यंभूत माहिती यू-डायस प्लस पोर्टलवर भरण्याचे आदेश आहे. मात्र महाराष्ट्रातील एक लाख दहा हजार शाळांपैकी अद्याप ५० टक्के शाळांनीही माहिती भरलेली नाही. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षातील योजनांची अंमलबजावणी रखडण्याची शक्यता आहे.समग्र शिक्षा अभियानातून शाळांसाठी विविध लाभाच्या योजना राबविल्या जातात. त्यासाठी केंद्र शासनाकडून ६० टक्के निधी वर्षाच्या सुरुवातीलाच दिला जातो. आजपर्यंत यू-डायसवरील विद्यार्थी संख्या आणि शिक्षक संख्या गृहीत धरून योजनांसाठी निधी पुरविला जात होता. मात्र आता या योजनांचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी यू-डायस प्लस हे अद्ययावत पोर्टल तयार करण्यात आले आहे. त्यावर पहिली ते बारावीपर्यंतच्या प्रत्येक शाळेने माहिती भरण्याचे आदेश आहे. त्यासाठी १५ मे ही अंतिम मुदत असतानाही एक लाख दहा हजार १८९ शाळांपैकी आतापर्यंत केवळ तीन हजार ८५९ शाळांची माहिती प्रमाणित करण्यात आली आहे. तर ५३ हजार ३६७ शाळांनी माहिती भरलेली आहे. शिवाय १५ हजार शाळांनी जेमतेम माहिती भरण्यासाठी लॉगइन केले आहे. येत्या आठ दिवसात ५० हजारांपेक्षा अधिक शाळांनी माहिती न भरल्यास गणवेशासह मोफत पाठ्यपुस्तकांच्या योजनेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.विदर्भातील शाळांची पिछेहाटविदर्भातील बहुतांश शाळांनी यू-डायस प्लसकडे दुर्लक्ष केले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ३३५४ शाळांपैकी केवळ १५२ शाळांनी या पोर्टलवर माहिती प्रमाणित केली आहे. तर वाशिम जिल्ह्यात १३९९ शाळा असताना केवळ २८, वर्धा १५१९ शाळा असताना केवळ १२, नागपूर ४१११ शाळा असताना केवळ सात शाळांनी पोर्टलवर माहिती प्रमाणित केली आहे. तसेच गोंदिया जिल्ह्यात १६७९ शाळा असून फक्त सहा तर गडचिरोली जिल्ह्यात २०८३ पैकी केवळ ४२ शाळांनी माहिती प्रमाणित केली. चंद्रपूर जिल्ह्यात २५२६ पैकी ६९, बुलडाणा जिल्ह्यात २४६७ पैकी ३२, भंडारा जिल्ह्यात १३१४ पैकी ५६, अमरावती जिल्ह्यात २८९७ पैकी १७६, अकोला जिल्ह्यात १८७८ शाळा असताना केवळ ९८ शाळांची माहिती आतापर्यंत प्रमाणित होऊ शकलेली आहे.

टॅग्स :Schoolशाळा