शाळा ऑफलाईन, शिक्षण ऑनलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 05:00 IST2020-05-05T05:00:00+5:302020-05-05T05:00:42+5:30
सोशल मीडियावरून पालकांमार्फत विद्यार्थ्यांना आवाहन करून व्हॉटसअप ग्रुप जॉईन करण्यासाठी लिंक देण्यात आली. काही दिवसांतच व्हॉट्सअॅपचे चार ग्रुप फुल्ल झाले. प्रथम कोषटवार दौलतखान विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सीमित असलेला हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचला. त्याची दखल घेत बंगलोर येथील अगस्त्य फाऊंडेशनचे सार्थक सपकाळ यांनी डीजिटल समर कॅम्प सुरू करण्यासाठी सहकार्य केले.

शाळा ऑफलाईन, शिक्षण ऑनलाईन
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : येथील तंत्रस्नेही शिक्षक चंद्रकांत ठेंगे यांनी ऑनलाईन उन्हाळी वर्ग आणि प्रश्नावलीकरिता पुढाकार घेतला. लॉकडाऊनमुळे शाळा ऑफलाईन झाल्या, मात्र शिक्षण ऑनलाईन देण्याचा ध्यास त्यांनी घेतला.
सोशल मीडियावरून पालकांमार्फत विद्यार्थ्यांना आवाहन करून व्हॉटसअप ग्रुप जॉईन करण्यासाठी लिंक देण्यात आली. काही दिवसांतच व्हॉट्सअॅपचे चार ग्रुप फुल्ल झाले. प्रथम कोषटवार दौलतखान विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सीमित असलेला हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचला. त्याची दखल घेत बंगलोर येथील अगस्त्य फाऊंडेशनचे सार्थक सपकाळ यांनी डीजिटल समर कॅम्प सुरू करण्यासाठी सहकार्य केले.
ऑनलाईन उन्हाळी वर्ग सुरू करताच इतर शाळांतील विद्यार्थ्यांच्या पालकांच्या विनंतीवरून नवीन समूह तयार करण्यात आले. आता सुमारे ९00 विद्यार्थी या ग्रुपला जोडले गेले. आजवर स्वरचित कविता, निबंध लेखन, कागद काम, टाकावूपासून टिकाऊ वस्तू तयार करणे आदी उपक्रम विद्यार्थ्यांना देण्यात आले. या विद्यार्थ्यांना डीजिटल प्रशस्तीपत्र देण्यात आले.
विद्यार्थ्यांना घरबसल्या धडे मिळत असल्याने पालकांमध्येही समाधान आहे.
विविध स्पर्धेतील विजेते विद्यार्थी
स्वरचित कविता स्पर्धेत पहिली ते पाचवीच्या गटात मोहिनी वसंता जाधव, भक्ती भास्कर मदने, समर्थ अमित सुरोशे, वेदांत खंदारे, अनुज विशाल दरोडकार यांनी अनुक्रमे पहिला ते पाचवा क्रमांक पटकाविला. याच गटात इंग्रजी माध्यमात आदित्य संतोष किवले याने पहिला क्रमांक प्राप्त केला. सहावी ते नववीच्या गटात सार्थक संजय गावंडे, अमितेश अशोक शिरगिरे, गौरी शरद काळे, तनुश्री दिगंबर खंदारे, राहुल संतोष राठोड यांनी अनुक्रमे पहिला ते पाचवा, तर याच गटात इंग्रजी माध्यमात अमितेश अशोक शिरगिरे, अवंती चंद्रकांत ठेंगे, वेदिका वसंत जाधव यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक प्राप्त केला. श्रेया अभिजित सरनाईक, राधिका विजय देशमुख यांनी परीक्षण केले. या उपक्रमासाठी चंद्रकांत ठेंगे यांना संस्थाप्रमुख अॅड. उमेश चिद्दरवार, डॉ. आनंद मुखरे, श्रीकांत सरनाईक, मुख्याध्यापक वृंदा पलिकोंडावार, हरिदास बोके, गजानन वायकुळे, सुरेश धनवे, राजेंद्र महाजन आदींचे सहकार्य लाभले.