पुसदमध्ये शालेय आरोग्य तपासणीचा बोजवारा
By Admin | Updated: January 8, 2015 23:02 IST2015-01-08T23:02:50+5:302015-01-08T23:02:50+5:30
विद्यार्थी सुदृढ राहून त्यांचे शालेय अध्ययनात लक्ष लागावे म्हणून शासनाने विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी सक्तीची केली आहे. त्यातच सिकलसेल या आजाराचा प्रादूर्भाव विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत.

पुसदमध्ये शालेय आरोग्य तपासणीचा बोजवारा
पुसद : विद्यार्थी सुदृढ राहून त्यांचे शालेय अध्ययनात लक्ष लागावे म्हणून शासनाने विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी सक्तीची केली आहे. त्यातच सिकलसेल या आजाराचा प्रादूर्भाव विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. या आजाराने ग्रस्त विद्यार्थी शोधण्याचे आव्हान आहे. अलिकडेच एका विद्यार्थ्याचा सिकलसेल आजाराने मृत्यू झाला. त्यामुळे पुसद तालुक्यात शालेय आरोग्य तपासणीचा बोजवारा उडाल्याचे दिसून येते.
अपंग आणि सिकलसेल आजाराने ग्रस्त असलेल्या विद्यार्थ्याने १० वी आणि १२ वीच्या परीक्षेत अतिरिक्त वेळ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याबरोबरच विद्यार्थ्यांचे आरोग्यमान उंचावून त्यांचे शिक्षणात लक्ष लागावे यासाठी आरोग्य तपासणी सक्तीची केली आहे. सिकलसेलग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षेत अतिरिक्त कालावधी मिळणार आहे. त्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. आरोग्य तपासणीत सिकलसेलग्रस्त विद्यार्थी आढळून येत नसल्याने त्यांना शोधायचे कसे असे आव्हान प्रशासनापुढे आहे. मात्र तपासणीच एक सोपस्कार बनल्याने हे आव्हानही कितपत पेलले जाईल याबद्दलही शंका व्यक्त होत आहे. तालुक्यात विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सिकलसेल आजराचा प्रादुर्भाव आहे हे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात सिकलसेलचे युनीट आहे. सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत दरवर्षी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी होते. त्यात आजारी असलेल्या विद्यार्थ्यांना विशेष उपचार देऊन सुदृढ करणे अथवा आजार नियंत्रित करणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)