शाळेची घंटा 28 जूनला वाजणार पण विद्यार्थ्याविनाच शाळा भरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 05:00 IST2021-06-20T05:00:00+5:302021-06-20T05:00:07+5:30
महाराष्ट्रात १५ जूनपासून सत्र सुरू झाले. तर जिल्ह्यात २८ जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार सुरुवातीला केवळ शिक्षकांना शाळेत बोलावले जाणार आहे. विद्यार्थ्यांना केवळ ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन संस्थेमार्फत दररोज ऑनलाईन अभ्यासमाला सुरू करण्यात आली आहे.

शाळेची घंटा 28 जूनला वाजणार पण विद्यार्थ्याविनाच शाळा भरणार
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विदर्भात व यवतमाळ जिल्ह्यात शैक्षणिक सत्र २८ जूनपासून सुरू होणार आहे. उर्वरित महाराष्ट्राप्रमाणेच जिल्ह्यातही सध्या ऑनलाईन शिक्षण सुरू केले जाणार आहे. त्यामुळे २८ जून रोजी शाळा सुरू झाल्या तरी शाळेत विद्यार्थ्यांचा किलबिलाट परतण्याची सध्याच शक्यता नाही. केवळ शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याचे आदेश आहेत.
महाराष्ट्रात १५ जूनपासून सत्र सुरू झाले. तर जिल्ह्यात २८ जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार सुरुवातीला केवळ शिक्षकांना शाळेत बोलावले जाणार आहे. विद्यार्थ्यांना केवळ ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन संस्थेमार्फत दररोज ऑनलाईन अभ्यासमाला सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील शाळा अद्याप सुरू झालेल्या नसल्या तरी ही अभ्यासमाला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविली जात आहे. मात्र मोबाईल आणि नेटवर्कअभावी ग्रामीण भागात यंदाही ऑनलाईन शिक्षणात खंडच पडण्याची शक्यता आहे.
संचालकांचे पत्र म्हणते...
पहिली ते नववी व अकरावीच्या शिक्षकांना शाळेत ५० टक्के उपस्थिती अनिवार्य राहणार आहे.
दहावी व बारावीच्या शिक्षकांना मात्र शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य आहे.
शिक्षकेत्तर कर्मचारी, प्राचार्य यांची शंभर टक्के उपस्थिती असेल.
दहावी, बारावीच्या निकालासाठी शंभर टक्के उपस्थिती आवश्यक आहे.
जि.प.च्या पत्राचे काय?
जिल्ह्यातील शाळा २८ जूनपासून सुरू होणार आहे. मात्र शिक्षकांच्या उपस्थितीचे निकष काय असतील याबाबत जिल्हा परिषद सोमवारी पत्र जारी करणार आहे.
तूर्त शिक्षण संचालकांच्या पत्रानुसारच उपस्थतीबाबत शिक्षकांना सूचना आहे.
नववी व अकरावीपर्यंत ५० टक्के तर दहावी, बारावीसाठी १०० टक्के उपस्थिती राहील.
शिक्षक आणि विद्यार्थी शाळेसाठी उत्सूक
जेथे कोरोना रुग्ण नाही अशा गावात विद्यार्थ्यांना शाळेत बोलविण्यास हरकत नाही. शिक्षकांनाही १०० टक्के उपस्थिती आवश्यक करावी. मात्र त्यासोबतच शंभर टक्के लसीकरणासाठी प्रयत्न केले जावे.
- संदीप कोल्हे, शिक्षक, सुकळी ता.कळंब
शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांनाही शाळेची उत्सुकता लागलेली आहे. पण पूर्ण लसीकरण होईपर्यंत पालकांची मानसिक तयारी दिसत नाही. शिक्षकांना शाळेत शंभर टक्के उपस्थिती बंधनकारक करण्यात यावी. शिक्षक स्वत: शाळेत जाण्यास तयार आहे.
- किशोर बनारसे, शिक्षक, कवठाबाजार आर्णी