शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

टंचाई भीषण, तरीही निर्णय संथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 22:29 IST

ऐन वेळेवर गोखीचा पर्याय निवडण्याचे काम केले. घिसाडघाईत गोखीचे पाणी शहरात आणताच आले नाही. जवळपास ४२ लाखांच्या पाईपलाईनचा खर्च व्यर्थ ठरला. आता टँकर आणून पाणी वाटप हा परंपरागत उपाय केला जाऊ लागला.

ठळक मुद्देउपायांना नियमाचे बंधन : पालिकेकडे समन्वयाचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ऐन वेळेवर गोखीचा पर्याय निवडण्याचे काम केले. घिसाडघाईत गोखीचे पाणी शहरात आणताच आले नाही. जवळपास ४२ लाखांच्या पाईपलाईनचा खर्च व्यर्थ ठरला. आता टँकर आणून पाणी वाटप हा परंपरागत उपाय केला जाऊ लागला. अशात भूजल पातळी झपाट्याने कमी झाली. त्यासोबत टँकरच्या पाण्याची मागणी वाढली. जानेवारीत लागलेले टँकर मे मध्ये मागणी पूर्ण करू शकले नाही. आरडोओरडा वाढल्यानंतर ३५ हजार लिटरचे टँकर प्रशासनाने शहरात आणले. त्यातही आठवडाभर टँकरचा खेळखंडोबाच झाला. पाणी टाकीत टाकून नळाने द्यायचे, हाही प्रयोग जनता तडफडत असताना करून पाहिला. काही साध्य होत नसल्याचे लक्षात येताच टँकरमधून टँकर भरण्याचा उपक्रम सुरू झाला. यातही फेऱ्या व वेळेच्या मर्यादा असल्याने सायंकाळी ५ नंतर पाणी बंद होते.टंचाईचा निधी मिळविण्यासाठी शहराला दुष्काळी क्षेत्र जाहीर केले. तीन कोटींचा भक्कम निधी आला. मात्र त्यासोबतच जाचक अटीही स्वीकाराव्या लागल्या. खासगी व सामूहिक बोअरवेल करण्यास निर्बंध घातले. शहरातून खासगी टँकर भरण्यावर बंदी आणली. याने दिलासा तर दूर टंचाईच्या संकटात भरच पडली. महसूलातील अधिकारी जनतेपर्यंत पाणी पोहोचते की नाही याची खातरजमा करण्याऐवजी पाणी कसे मिळणार नाही, अशा दुष्काळी निकषांची अंमलबजावणी करण्यातच धन्यता मानू लागले. कठोर निकषाविरोधात तीव्र आक्षेप उमटल्यानंतर शासकीय बोअरवेल खोदण्याला परवानगी मिळाली. तसेच खासगी टँकरला शहराबाहेरून पाणी आणण्यास सवलत दिली. भीषण टंचाईत शहर होरपळत असताना प्रशासकी यंत्रणेची अंमलबजावणीच्या नावाने केवळ रंगीत तालीम सुरू आहे. आताही एक ना अनेक पर्याय उपलब्ध असताना नियोजनशून्यता कायम आहे.उपाययोजनेच्या कामांची जबाबदारी असलेले अधिकारी, कर्मचारी कधीच गंभीर दिसत नाही. उलट नगरपरिषदेची यंत्रणा जीवन प्राधिकरणकडे बोट दाखविते. महसूल यंत्रणा त्रयस्तपणे केवळ फोनवरून आकडेवारी घेण्यात धन्यता मानते. नगरपरिषदेचा पाणीपुरवठा विभाग पूर्णत: निद्रिस्त आहे. येथील अधिकारीवर्ग सातत्याने व्यस्तता दाखवून एकाही भागात पोहोचत नाही. या पाणीपुरवठा विभागाने अनेक उपाययोजना राबविल्या. कोट्यवधीच्या घरातील निधीही जिरविला. पाणी मात्र पोहोचलेच नाही, हे वास्तवही नगरसेवकांच्या चर्चेतून बाहेर आले. नियोजनाचा आराखडा तयार करताना उणिवा राहिल्याची प्रांजळ कबुलीसुध्दा नगरसेवकांनी दिली.उपाययोजनांच्या खर्चाची आकडेवारीनिळोणा, चापडोह फ्लोटींग पंप - एक कोटी ५० लाख, गोखीची तात्पुरती पाईपलाईन - ४५ लाख, विहिरीची स्वच्छता - ३५ लाख, हांतपंप दुरुस्ती, विंधन विहिरींसाठी भाड्याने घेतलेले मोटरपंप (२००० प्रति दिवस) या सर्व आकड्यांची गोळाबेरीज केली आणि प्रत्यक्ष शहरात नागरिकांना मिळालेले पाणी याचा हिशेब काढला तर मोठी तफावत दिसून येते. इतका पैसा मोजूनही दूषित पाणी अनेक घरात पोहोचले. अजूनही पिण्याच्या पाण्याची समस्या कायमच आहे. आरोग्याचा प्रश्न केव्हाही उद्भवू शकतो. प्रभाग ११ मध्ये दूषित पाण्याने कॉलरासारख्या साथीची लागण झाली होती. यात एकाला प्राणही गमवावा लागला.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई