सरपंच, उपसरपंचांचा सत्कार
By Admin | Updated: May 14, 2015 02:23 IST2015-05-14T02:23:58+5:302015-05-14T02:23:58+5:30
तालुका काँग्रेस कमिटीतर्फे तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचांचा मंगळवारी येथील वसंत जिनिंगच्या सभागृहात सत्कार करण्यात आला.

सरपंच, उपसरपंचांचा सत्कार
वणी : तालुका काँग्रेस कमिटीतर्फे तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचांचा मंगळवारी येथील वसंत जिनिंगच्या सभागृहात सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार वामनराव कासावार होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार नरेश पुगलीया, जीवन पाटील उपस्थित होते. यावेळी उमरी येथील सरपंच शारदा माथनकर, उपसरपंच राजेश सिडाम, मानकीचे सरपंच अरूणा काकडे, उपसरपंच विनोद काकडे, शेलू बु.चे सरपंच सुमन पाचभाई, उपसरपंच बंडू मालेकार, घोन्साच्या सरपंच निरूपमा पथाडे, रासाच्या सरपंच रत्नमाला ठावरी, उपसरपंच वासुदेव पिंपळशेंडे, निवली येथील सरपंच विजया पाटील, पुरडच्या सरपंच इंदिरा कोंगरे, उपसरपंच अनिल धोटे, भालरचे सरपंच नरेंद्र वरारकर, मोहोर्लीचे सरपंच अरविंद डाहुले, उपसरपंच विठ्ठल कोडापे यांचा सत्कार करण्यात आला.
याशिवाय दहेगावचे सरपंच बाळू निखाडे, परसोडाच्या सरपंच संगिता काकडे, उपसरपंच बालाजी म्हसे, वडजापूरचे सरपंच प्रफुल्ल ठाकरे, उपसरपंच सुनिता डोहे, उकणीच्या सरपंच संगिता संजय खाडे, उपसरपंच नरेंद्र बलकी, सावर्लाचे सरपंच अॅड.चोपणे, उपसरपंच अविनाश सोमलकर, शिरपूरच्या सरपंच लता फेतफुलवार, उपसरपंच विजय भांगडे यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वामनराव कासावार यांनी नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले. पाहुण्यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला अॅड.देवीदास काळे, डॉ.पावडे, सुनील वरारकर, प्रशांत गोहोकार, राकेश खुराणा, टिकाराम कोंगरे, संजय खाडे, राजाभाऊ पाथ्रडकर, सुनील नांदेकर, विवेक मांडवकर, प्रमोद वासेकर, अॅड.राजीव कासावार, भास्कर गोरे व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. संचालन राजेश सिडाम, आभार अशोक चिकटे यांनी मानले. (कार्यालय प्रतिनिधी)