कर्तव्यावरील पोलिसांसाठी सॅनिटायझर व्हॅन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 05:00 IST2020-04-12T05:00:00+5:302020-04-12T05:00:12+5:30

यवतमाळातील प्रभाग १० व २० मध्ये कोरोनाचे एकाच वेळी आठ रुग्ण पॉझिटीव्ह आले आहे. हा संपूर्ण परिसर सील केला आहे. या ठिकाणी तैनात पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस व्हॅनलाच निर्जंतुकीकरण यंत्रणा बसविण्यात आली आहे. या भागात जिल्हा पोलीस दल, एसआरपीएफ, होमगार्ड जवान तैनात आहेत. शहर ठाणेदार धनंजय सायरे व लोहारा ठाणेदार सचिन लुले यांच्या संकल्पनेतून सॅनिटायझर व्हॅन तयार केली आहे.

Sanitizer van for police on duty | कर्तव्यावरील पोलिसांसाठी सॅनिटायझर व्हॅन

कर्तव्यावरील पोलिसांसाठी सॅनिटायझर व्हॅन

ठळक मुद्देसुरक्षिततेचा असाही उपाय । बंदोबस्ताच्या ठिकाणीच कर्मचाऱ्यांचे निर्जंतुकीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरात आठ कोरोना रुग्ण एकाच परिसरात आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. प्रशासनाकडून संसर्ग थांबविण्यासाठी विविध उपाय केले जात आहे. ३३ हजार ३४५ नागरिकांना होम क्वारंटाईन केले आहे. या भागात मोठा पोलीस बंदोबस्त आहे. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत त्यांच्यासाठीच निर्जंतुकीकरण फवारणारी पोलीस व्हॅन तयार केली आहे. या व्हॅनमध्ये काही मिनिट थांबल्यानंतर निर्जंतुकीकरण होते.
यवतमाळातील प्रभाग १० व २० मध्ये कोरोनाचे एकाच वेळी आठ रुग्ण पॉझिटीव्ह आले आहे. हा संपूर्ण परिसर सील केला आहे. या ठिकाणी तैनात पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस व्हॅनलाच निर्जंतुकीकरण यंत्रणा बसविण्यात आली आहे. या भागात जिल्हा पोलीस दल, एसआरपीएफ, होमगार्ड जवान तैनात आहेत. शहर ठाणेदार धनंजय सायरे व लोहारा ठाणेदार सचिन लुले यांच्या संकल्पनेतून सॅनिटायझर व्हॅन तयार केली आहे. या व्हॅनमध्ये फॉगर (फवारे) बसविले आहे. त्या माध्यमातून निर्जंतुकीकरण औषधाची फवारणी केली जाते. सूक्ष्म स्वरूपाचे फॉगर असल्याने बारिक तुषार त्यातून उडतात. एकाच रांगेत हे सर्व लावण्यात आल्याने कर्तव्यावरील पोलीस त्या व्हॅनमध्ये काही मिनिट थांबल्यानंतर डोक्यापासून पायापर्यंत निर्जंतूक होतो. याचा प्रभावी वापर सध्या केला जात आहे. ही व्हॅन बंदोबस्ताच्या ठिकाणी जाऊन कर्मचाऱ्यांना निर्जंतूक होण्यासाठी मदत करीत आहे. या सॅनिटायझर व्हॅनमधून सॅनिटाईझ होण्याचा अनुभव जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर अधीक्षक नुरुल हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला. त्यानंतरच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी ही व्हॅन फिरविली जात आहे.
या व्हॅनमुळे कोरोनाचा प्रादूर्भाव असलेल्या भागात कर्तव्य बजावणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. आरोग्य विभागाच्या चमूकडूनही परिसरात अधिकारी-कर्मचाऱ्यांचे स्क्रिीनिंग केले जाते.

Web Title: Sanitizer van for police on duty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस