रेतीचा टिप्पर उलटून चार मजूर दबले, एका तरुणाचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 05:00 IST2020-06-24T05:00:00+5:302020-06-24T05:00:31+5:30

सुरेश वासुदेव कोमटी (२२) रा. वाघापूर असे मृत युवकाचे नाव आहे. तो टिप्परवर मजूर म्हणून काम करीत होता. एमएच-३१-सीबी-८३४६ क्रमांकाच्या टिप्परवर सुरेश हा आपले वडील व दोन सहकाऱ्यांसह पिंटू डगवार याच्या घराजवळ रेती टाकण्यासाठी जात होता. दरम्यान अंधारात टिप्पर चालकाला खड्डा दिसला नाही. त्यातच हा टिप्पर पलटी झाला. रेतीवर बसून असलेले चौघेही रेतीखाली दबल्या गेले. तिघांना कसेबसे बाहेर काढण्यात आले.

A sand tipper overturned and crushed four laborers, killing a young man on the spot | रेतीचा टिप्पर उलटून चार मजूर दबले, एका तरुणाचा जागीच मृत्यू

रेतीचा टिप्पर उलटून चार मजूर दबले, एका तरुणाचा जागीच मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरात मोठ्या प्रमाणात अवैध रेतीची तस्करी सुरू आहे. मंगळवारी रात्री ३ वाजता पिंपळगाव परिसरातील डोनाडकर ले-आऊटमध्ये रेतीची खेप घेऊन आलेला टिप्पर उलटला. यात चौघे जण रेतीच्या ढिगाऱ्याखाली दबले. त्यामध्ये एका २२ वर्षीय मजुराचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण सुदैवाने बचावले. चोरीच्या रेतीचा भंडाफोड होऊ नये म्हणून सुरुवातीला प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला. अखेर दुपारी ३ वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
सुरेश वासुदेव कोमटी (२२) रा. वाघापूर असे मृत युवकाचे नाव आहे. तो टिप्परवर मजूर म्हणून काम करीत होता. एमएच-३१-सीबी-८३४६ क्रमांकाच्या टिप्परवर सुरेश हा आपले वडील व दोन सहकाऱ्यांसह पिंटू डगवार याच्या घराजवळ रेती टाकण्यासाठी जात होता. दरम्यान अंधारात टिप्पर चालकाला खड्डा दिसला नाही. त्यातच हा टिप्पर पलटी झाला. रेतीवर बसून असलेले चौघेही रेतीखाली दबल्या गेले. तिघांना कसेबसे बाहेर काढण्यात आले. सुरेश मात्र निपचित पडला होता. त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात नेले असता तेथे मृत घोषित करण्यात आले. सुरुवातीला लोहारा पोलिसांनी या प्रकरणी मर्ग दाखल केला. नंतर सुरेशच्या नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने या प्रकरणात शहर पोलीस ठाण्यात टिप्पर चालकाविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. अवैध रेती तस्करीनेच सुरेशचा बळी घेतल्याचा आरोप होत आहे.

Web Title: A sand tipper overturned and crushed four laborers, killing a young man on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात