यवतमाळ (महागाव) : महागाव तालुक्यातील मोरथ- वाकोडी नदीपात्रातून रेतीची तस्कारी सुरू असताना पोलिसांनी धाड टाकली. कारवाई करण्यासाठी आलेल्या पाेलिांवरच काही जणांनी हल्ला केला. जीव वाचविण्यासाठी पाेलिसांना अखेर हवेत दाेन राऊंड फायर करावे लागले, त्यानंतर हल्लेखाेर पसार झाले. या हल्लयात सहायक पाेलिस निरीक्षक जखमी झाले आहेत. ही घटना गुरूवारी सकाळी १० वाजता घडली. यामुळे संपूर्ण पाेलिस दलात खळबळ उडाली आहे. पाेलिस अधीक्षक कुमार चिंता घटनास्थळी दाखल झाले आहे. हल्लेखाेरापैकी दाेघांना महागाव पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सहायक निरीक्षक सुनील अंभोरे असे जखमी अधिकाऱ्याचे नाव आहे. ते पथकासह कारवाई करत असताना पाच जणांनी त्यांच्यावर हल्ला केला, तुफान हाणामारी झाली, शेवटी स्वतःच्या बचावा करिता अंभाेरे यांनी गोळीबार केल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात येत आहे.
आरोपीच्या काही नातेवाईकांना महागाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पाेलिस कारवाईत शेख गुलाब(२५) हा तरुण जखमी झाल्याची माहिती आहे. त्याला पुसद येथे उपचारासाठी दाखल केले आहे. या घटनेला ठाणेदार धनराज निळे यांनी दुजोरा दिला असून ते घटनास्थळी तात्काळ दाखल झाले आहेत.
ट्रॅक्टर चालक गुरुवारी सकाळी नऊ वाजता नदीपात्रात उतरले होते. काहींनी ट्रॅक्टर भरले तर काहीचे रिकामेच होते याच वेळी महागाव येथील सहाय्यक निरीक्षक सुनील अंभोरे त्यांच्या पथकासह नदीपात्रात अवैध रेती वाहतुकीवर धाड मारण्याकरिता गेले होते. उपस्थित ट्रॅक्टर चालकांनी पोलिसांसाेबत वाद घातला तर यात काहींनी थेट अंभाेरे यांच्यावर हल्ला चढविला. त्याचवेळी अंभाेरे यांनी दोन राऊंड फायर केले. गोळीबाराचा आवाज ऐकताच एकच धांदल उडाली उपस्थित असलेले नागरिक सैरावैरा पळाले. या घटनेची माहिती प्रत्यक्षदर्शी शिवाजी देशमुख सवनेकर यांना दिली.
"सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंभोरे हे कार्यवाहीसाठी गेले असता त्या ठिकाणी पाच आरोपींनी मिळून आंबोरे यांच्यावर हमला केला स्वतःच्या रक्षणाकरिता त्यांनी दोन राऊंड फायर केले अंभोरे यांच्या बोटाला मार आहे या घटनेतील दोन आरोपी अटक करण्यात आली असून तीन फरार आहेत त्यांचा शोध घेत आहोत."- धनराज निळे, ठाणेदार, पोलीस स्टेशन महागाव.
Web Summary : In Yavatmal, sand smugglers attacked police during a raid, injuring an officer. Police fired two rounds in self-defense. Two suspects are arrested, and investigation is underway.
Web Summary : यवतमाल में रेत तस्करों ने छापे के दौरान पुलिस पर हमला किया, जिसमें एक अधिकारी घायल हो गया। पुलिस ने आत्मरक्षा में दो राउंड फायर किए। दो संदिग्ध गिरफ्तार, जांच जारी।