जवळा परिसरात रेती माफियांचा धुडगूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 05:00 IST2020-07-04T05:00:00+5:302020-07-04T05:00:19+5:30
रेती माफियांवर कुणाचाच वचक नाही. आर्णी तहसील प्रशासनाच्या आशीर्वादाने त्याने माया जमवली. प्रति ब्रास सात हजार रुपये दराने रेती विकून माफिया गब्बर होत आहे. जवळा परिसरात अडाण नदीवरून मोठ्या प्रमाणात रेती आणली जात आहे. दररोज १0 ते १२ ट्रक्टरवदारे खुलेआम रेतीचा उपसा सुरू आहे. काही रेती माफियांनी शेकडो ब्रास रेतीची साठवणूक करून ठेवली आहे.

जवळा परिसरात रेती माफियांचा धुडगूस
लोकमत न्यूज नेटवर्क
जवळा : आर्णी तालुक्यातील जवळा परिसरात रेती माफियांनी धुमाकूळ घातला आहे. रेती माफिया शिरजोर झाले असून तलाठी, मंडळ अधिकारी, शेतकऱ्यांमध्ये भीतीची वातावरण निर्माण झाले आहे.
रेती माफियांवर कुणाचाच वचक नाही. आर्णी तहसील प्रशासनाच्या आशीर्वादाने त्याने माया जमवली. प्रति ब्रास सात हजार रुपये दराने रेती विकून माफिया गब्बर होत आहे. जवळा परिसरात अडाण नदीवरून मोठ्या प्रमाणात रेती आणली जात आहे. दररोज १0 ते १२ ट्रक्टरवदारे खुलेआम रेतीचा उपसा सुरू आहे. काही रेती माफियांनी शेकडो ब्रास रेतीची साठवणूक करून ठेवली आहे. साठविलेली रेती ब्राम्हणवडा, ब्राम्हणवडा तांडा, शेकलगाव, जवळा शेतशिवारात मोठ्या प्रमाणात दिसून येते. तेथूनच रात्री अंधारात ट्रकने दारव्हा, यवतमाळ येथेही रेतीची वाहतूक केली जाते.
अवैध रेती वाहतुकीने शेत शिवराचे रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झाले आहे. याची माहिती संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदारांनाही आहे. मात्र तरीही रेती माफियांवर कारवाई होत नाही. त्यामुळे रेती माफिया माझे कोणीच काही करू शकत नाही, असे ठासून सांगत आहे. यामुळे नदी काठच्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सामान्य माणसाचा तहसील कार्यालयावरील विश्वास उडालेला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन शेकडो ब्रास साठवलेल्या रेतीचा पंचनामा करून रेती माफियावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
विविध योजनांच्या घरकुलांचे काम रखडले
परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विविध योजनेतील घरकुलांचे बांधकाम सुरू आहे. प्रति ब्रास सात हजार रुपयांप्रमाणे लाभार्थी रेती खरेदी करू शकत नाही. त्यामुळे माफियांनी साठविलेल्या रेतीचा पंचनामा करून ती रेती घरकूल लाभार्थ्यांना उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा ज्ञानदीप चोपडे यांनी व्यक्त केली. घरकूल लाभार्थी सुनिता गजानन पवार यांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकूल मंजूर झाले. मात्र बांधकामाला लागणाऱ्या रेतीचा दर प्रचंड असल्याने त्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार की नाही, याची त्यांना काळजी लागली आहे. अधिकाºयांनी रेती तस्करीकडे लक्ष देऊन गरिबांचे स्वप्न पूर्ण करावे, अशी आशा त्यांनी वयक्त केली.