शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

जखमेवर मीठ, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांस आमदाराकडून २ हजारांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 20:29 IST

उमरखेड तालुक्यातील हिरामण नगर -निंगणुर येथील शेतकरी चंपत नारायण जंगले यांनी कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून आत्महत्या केली होती.

यवतमाळ - शेतकरी आत्महत्या ही महाराष्ट्रातील जलीट समस्या बनली असून विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही केल्या थांबताना दिसत नाहीत. सरकार शेतकऱ्यांसाठी पॅकेजेस जाहीर करते, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांस मदत जाहीर करते. मात्र, कर्ज आणि नापिकी किंवा अतिवृष्टीमुळे आत्महत्या होतच आहेत यवतमाळ जिल्ह्यात आणखी एका शेतकऱ्याने आत्महत्या करत जीवन संपवले. मात्र, या पीडित कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी गेलेल्या आमदाराने चक्क बंद पाकिटात २ हजार रुपयांची मदत देऊन जखमेवर मीठ चोळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.                                   उमरखेड तालुक्यातील हिरामण नगर -निंगणुर येथील शेतकरी चंपत नारायण जंगले यांनी कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून आत्महत्या केली होती. त्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला आमदार नामदेवराव ससाने यांनी भेट देऊन बंद लिफाफामध्ये दोन हजारांची भेट दिली. आमदार महोदयांनी आत्महत्याग्रस्त कुटूंबाची एक प्रकारे थट्टाच केल्याचं दिसून आलं. या प्रकरणाचा गाजावाजा होताच आमदार ससाणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांकडून आणखी तीन हजार रुपये पाठवून मोठा दिलदार पणा दाखवला. दरम्यान, आमदार महोदयांचे हे कृत्य म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. तर, सोशल मीडियातूनही संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, आमदार नामदेवराव ससाणे हे भाजप पक्षातून आमदार म्हणून निवडून आले आहेत.

विशेष म्हणजे, दुसरीकडे पक्षाने नुकत्याच आयोजित केलेल्या दहीहांडीत कार्यक्रमात आमदार नामदेव ससाणे यांनी पूर्ण वेळ उपस्थित राहून पुढल्या वर्षी दहीहंडी बक्षीस रक्कम दोन लाख देण्याचे जाहीर केले. मात्र, आमदारांकडून आलेल्या दोन हजार रुपयांच्या मदतीचं काय करावं, सासूचा दवाखाना की शेतीसाठी खतं-बियाणं आणावीत, असा प्रश्न आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पीडित पत्नीला पडला आहे.

टॅग्स :YavatmalयवतमाळMLAआमदारfarmer suicideशेतकरी आत्महत्या