शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, पुनर्गठण नको, कर्जमाफी द्या

By admin | Updated: June 4, 2016 02:06 IST

साहेब, कर्ज पुनर्गठण नको, आता केवळ कर्जमाफीच द्या, अशा शब्दात जिल्ह्यातील दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांनी आपली व्यथा

केंद्रीय पथक जिल्ह्यात : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा, वाळलेल्या बागेची पाहणीयवतमाळ : साहेब, कर्ज पुनर्गठण नको, आता केवळ कर्जमाफीच द्या, अशा शब्दात जिल्ह्यातील दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांनी आपली व्यथा दिल्लीहून दाखल झालेल्या केंद्रीय पथकापुढे व्यक्त केली. या पथकाने शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत जिल्ह्यातील दुष्काळाचे दाहक वास्तव जवळून अनुभवले. जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी नीती आयोगाचे सदस्य डॉ. रामनंद यादव यांच्या नेतृत्वातील केंद्रीय पथकाने शुक्रवारी यवतमाळ जिल्ह्याला भेट दिली. गुरुवारीच पथक यवतमाळात येणार होते. मात्र एक दिवस उशिराने सदर पथक दाखल झाले. शुक्रवारी सकाळी यवतमाळ तालुक्यातील भारी आणि कळंब तालुक्यातील चापर्डा गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. इतकेच नव्हे तर वाळलेल्या फळ बागांची पाहणी या पथकाने केली. बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास तयार नाही, मिळालेले कर्ज कमी पडते, महागाईत बियाणे आणि खतांची खरेदी अशक्य आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना बियाण्यांचे पॅकेज मिळेल तर लाभदायक राहील, असे सांगितले. पीक विम्याची मदत कर्जात कापल्या जात असल्याचेही अनेक शेतकऱ्यांनी सांगितले. या पथकासमोर सिंचन, कालव्याचे अर्धवट काम, कृषी पंपावरील भारनियमन आदी समस्या मांडल्या. तसेच शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर देण्याची मागणी करण्यात आली. या पथकाने चापर्डा येथे एका झाडाखाली सभा घेतली. त्यानंतर अशोक कांबळे आणि सुभाष सरोदे यांच्या वाळलेल्या सत्रा बागेची पाहणी केली. जिल्ह्यातील दुष्काळाचे वास्तव अनुभवून पथकातील सदस्यही अस्वस्थ झाले होते. हा अहवाल पथक केंद्र सरकारला सादर करेल, त्यानंतर मदतीची अपेक्षा आहे. (शहर वार्ताहर)