गळव्हाचे शेतकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 11:53 PM2018-06-20T23:53:48+5:302018-06-20T23:53:48+5:30

‘अमृत’ योजनेचे पाईप फुटल्याने शेती पिकाच्या नुकसानीची भरपाई मागणाऱ्या शेतकऱ्यांना टोलविले जात आहे. त्यामुळे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. बुधवारी त्यांनी या योजनेचे काम सांभाळणाºया समन्वयकाची भेट घेतली.

Rustic farmer aggressive | गळव्हाचे शेतकरी आक्रमक

गळव्हाचे शेतकरी आक्रमक

Next
ठळक मुद्दे‘अमृत’चे पाईप फुटले : नुकसान भरपाईसाठी पाच दिवसांपासून हेलपाटे

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ‘अमृत’ योजनेचे पाईप फुटल्याने शेती पिकाच्या नुकसानीची भरपाई मागणाऱ्या शेतकऱ्यांना टोलविले जात आहे. त्यामुळे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. बुधवारी त्यांनी या योजनेचे काम सांभाळणाऱ्या समन्वयकाची भेट घेतली. त्यावेळी त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा आरोप केला जात आहे. शेतात योजनेचे काम करू दिले जाणार नाही, अशी भूमिका शेतकºयांनी घेतली आहे.
बेंबळा धरणावरून यवतमाळसाठी पाणी आणण्याकरिता शेतातून पाईपलाईन टाकण्यात आली आहे. शनिवारी गळव्हा गावाजवळ पाईपलाईन फुटली. वाहून गेलेल्या पाण्यामुळे संपूर्ण शेत खरडून गेले. अक्षरश: शेतातून पूर गेला. पेरलेले बियाणे, टाकलेले खत वाहून गेले. झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी या मागणीसाठी प्रफुल्ल खोके, प्रदीप बोबडे, तुळशीराम बोबडे, मोहन वाघमारे, रामराव कुकडे हे शेतकरी गेली पाच दिवसांपासून संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटी घेत आहे. जिल्हाधिकारी, मजीप्राचे अधिकारी यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी लोकप्रतिनिधींनाही निवेदन दिले. परंतु कुणीही त्यांचा प्रश्न गांभीर्याने घेतला नाही. योजनेच्या कंत्राटदाराने समन्वयकाकडे बोट दाखविले.
बुधवारी या शेतकऱ्यांनी समन्वयक दिनेश बोरकर यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणे तर दूरच चक्क हाकलून लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. कुठेही न्याय मिळण्याची आशा दिसत नसल्याने आता या शेतकऱ्यांनी योजनेच्या कामासाठी शेतात कुणालाही पाय ठेऊ दिला जाणार नाही, अशी भूमिका घेतली.

Web Title: Rustic farmer aggressive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी