‘पोलीस रायझिंग डे’निमित्त रूट मार्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 06:00 IST2020-01-05T06:00:00+5:302020-01-05T06:00:12+5:30

जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर, प्रभारी पोलीस उपअधीक्षक प्रदीप शिरसकर, पोलीस निरीक्षक अनिल किनगे, अवधुतवाडीचे ठाणेदार आनंद वागदकर, शहर ठाणेदार धनंजय सायरे, ग्रामीण ठाणेदार संजय शिरभाते, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप वडगावकर आदी यावेळी उपस्थित होते.

Route March for 'Police Rising Day' | ‘पोलीस रायझिंग डे’निमित्त रूट मार्च

‘पोलीस रायझिंग डे’निमित्त रूट मार्च

ठळक मुद्देसंडे अँकर । विद्यार्थ्यांना दिली शस्त्रांची माहिती, विविध प्रात्यक्षिक, मुख्यालयात कार्यक्रमांची रेलचेल

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा पोलीस दलाच्यावतीने २ ते ८ जानेवारी दरम्यान पोलीस रायझिंग डे साजरा करण्यात आला. यानिमित्त पोलिसांनी विविध उपक्रम राबविले. ४ जानेवारी रोजी पोलिसांनी एसपी एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनात शहरातून रूट मार्च केला. त्यानंतर पोलीस मुख्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर, प्रभारी पोलीस उपअधीक्षक प्रदीप शिरसकर, पोलीस निरीक्षक अनिल किनगे, अवधुतवाडीचे ठाणेदार आनंद वागदकर, शहर ठाणेदार धनंजय सायरे, ग्रामीण ठाणेदार संजय शिरभाते, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप वडगावकर आदी यावेळी उपस्थित होते. हा रूट मार्च शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत गेला. त्यानंतर डॉ. नंदूरकर विद्यालयाचे महेशकर, यवतमाळ पब्लिक स्कूलचे प्रवीण कळसकर, कोल्हटकर, विवेकानंद विद्यालयाचे प्रफुल्ल गावंडे, सत्यसाई इंग्लिश मीडियम स्कूलचे मोहसीन, स्नेहल रेचे व त्या शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. देवसंस्कृती विद्यालयाचे पूजा गवेल, प्रतिमा वर्मा, दिव्या शाहू यांच्यासह अधिकारी, कर्मचारी मुख्यालयातील कार्यक्रमात सहभागी झाले होते. एकूण ५०० जणांनी यावेळी सहभाग घेतला. प्रभात फेरी संपल्यानंतर विद्यार्थ्यांना शस्त्रास्त्राबाबत मार्गदर्शन करण्यात आले. श्वान पथकाच्या कार्याची माहिती दिली. पोलीस बँडचे वादन करण्यात आले. सविस्तर मार्गदर्शन करून श्वान गती, सिम्बा यांनी प्रात्यक्षिक दाखविले. या सर्व कार्यक्रमाचे संचालन जमादार प्रकाश देशमुख यांनी केले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलिसांच्या कार्याची माहिती
मुख्यालयातील कार्यक्रमात एसपी एम. राज कुमार यांनी पोलिसांच्या दैनंदिन कर्तव्याची माहिती दिली. पोलीस अधिकारी, कर्मचारी कुठल्या परिस्थितीत आपले कर्तव्य बजावतात. त्यांची एकूण दिनचर्या कशी असते. सण-उत्सवाच्या काळात कुटुंबापासून दूर राहात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी रस्त्यावर असतात. याची माहिती दिली.

Web Title: Route March for 'Police Rising Day'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस