Rodromio was washed by the citizens of Yavatmal district | यवतमाळ जिल्ह्यातील रोडरोमिओची नागरिकांनी केली धुलाई
यवतमाळ जिल्ह्यातील रोडरोमिओची नागरिकांनी केली धुलाई

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: रस्त्याने जाणाऱ्या महिलांना, चलती क्या, घरपे छोड देता असे म्हणत छेडणाºया मद्यपी मजनूची नागरिकांनी बुधवारी रात्री चांगलीच धुलाई केली.
चिखलगाव येथील रहिवासी असलेला अमोल शेरकी (३५) हा इसम मद्यप्राशन करून नांदेपेरा मार्गाने वणीकडे येत असताना रस्त्याने जात असलेल्या महिलांजवळ जाऊन त्यांना आपल्या दुचाकीवर बसण्याचा आग्रह करीत होता. त्यामुळे घाबरून गेलेल्या महिलांनी येथील मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांना खबर दिली. ही सूचना मिळताच राजू उंबरकर आपल्या सहकाऱ्यांसह तेथे पोहचले व शेरकीला चौदावे रत्न दाखवले. नंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

Web Title: Rodromio was washed by the citizens of Yavatmal district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.