यवतमाळमध्ये चाकूचा धाक दाखवून दरोडा, 6 लाखांचा मुद्देमाल लंपास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 13:32 IST2018-09-09T13:31:10+5:302018-09-09T13:32:06+5:30

नांदेपेरा येथील विरेंद्र जयस्वाल यांच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकत चोरट्यांनी तब्बल सहा लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

robbery in yavatmal district | यवतमाळमध्ये चाकूचा धाक दाखवून दरोडा, 6 लाखांचा मुद्देमाल लंपास 

यवतमाळमध्ये चाकूचा धाक दाखवून दरोडा, 6 लाखांचा मुद्देमाल लंपास 

यवतमाळ - वणी तालुक्यातील नांदेपेरा येथील विरेंद्र जयस्वाल यांच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकत चोरट्यांनी तब्बल सहा लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. रविवारी (8 सप्टेंबर) 2 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. दरोडेखोरांनी 70 हजार रुपयांची रोख रक्कम आणि 20 तोळे सोने असा लाखोंचा मुद्देमाल लंपास केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दरोडेखोरांची संख्या सहा होती. त्यांपैकी तीन जण हे हेल्मेट घालून होते. तर उर्वरित तिघांनी चेहर्‍यावर स्कार्फ बांधला होता. या चोरट्यांनी घरातील सदस्यांना चाकूचा धाक दाखवून तिजोरी गावाबाहेर नेली व तेथे तिजोरी फोडून मुद्देमाल लंपास केला. हा दरोडा टाकण्यापूर्वी दरोडेखोरांनी याच गावातील डॉ. पांडव यांचे बंद असलेले घर फोडण्याचा प्रयत्‍न केला. मात्र तेथे त्यांच्या हाती काहीही लागले नाही.


 

Web Title: robbery in yavatmal district