शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
4
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
5
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
6
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
7
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
8
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
9
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
10
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
11
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
12
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
13
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
14
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
15
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
16
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
17
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
18
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
19
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
20
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
Daily Top 2Weekly Top 5

दारूच्या गोदामावर दरोडा

By admin | Updated: October 22, 2014 23:24 IST

चौकीदाराला आणि त्याच्या पत्नीला १५ ते २० जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राच्या धाकावर खोली कोंडून ट्रकद्वारे तब्बल ३६ लाख रुपयांची विदेशी दारू लंपास केली. ही घटना येथील आर्णी मार्गावरील वाघाडी

३६ लाखांची दारू लंपास : दाम्पत्याला शस्त्राच्या धाकावर कोंडलेयवतमाळ : चौकीदाराला आणि त्याच्या पत्नीला १५ ते २० जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राच्या धाकावर खोली कोंडून ट्रकद्वारे तब्बल ३६ लाख रुपयांची विदेशी दारू लंपास केली. ही घटना येथील आर्णी मार्गावरील वाघाडी नदी परिसरात घडली. घटनेनंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. मात्र अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बिपीन बिहारी यांच्या आदेशानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. रमेश होतलदास मंगतानी रा. पत्रकार कॉलनी असे दारू गोदामावर दरोडा पडलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. मंगतानी यांचे येथील आर्णी मार्गावर परवानाकृत दारूचे गोदाम आहे. २० आॅक्टोबरला मध्यरात्री १५ ते २० अज्ञात दरोडेखोर अचानक तेथे आले. यावेळी गोदामावरील चौकीदार आणि त्याच्या पत्नीला झोपेतून उठवून टोळक्याने शस्त्राच्या धाकावर दमदाटी केली. तसेच लगतच्या एका खोलीत कोंडून दिले. भीतीपायी आणि गोदाम निर्जनस्थळी असल्याने आरडाओरड करूनही उपयोग नव्हता. त्यामुळे ते शांत राहिले. दरम्यान दरोडेखोरांनी ट्रकद्वारे तब्बल ३५ लाख ७० हजार रुपयांची दारू चोरुन नेली. तसेच पसार झाले. दुसऱ्या दिवशी ही बाब स्थानिक नागरिकांच्या लक्षात आली. त्यानंतर मंगतानी यांनी वडगाव रोड पोलिसात तक्रार दिली. मात्र पोलिसांनी संशय उपस्थित करून तक्रार नोंदविण्यास टाळाटाळ केली. नवनिर्वाचित आमदार मदन येरावार यांनी या प्रकरणी विशेष पोलीस महानिरीक्षक बिहारी आणि पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्याशी चर्चा केली त्यानंतर गुन्हा नोंदविण्यात आला. (स्थानिक प्रतिनिधी)