शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर आमदारकीचा राजीनामा देईन; आमदार मंदा म्हात्रेंचं गणेश नाईकांना चॅलेंज, भाजपात वाद पेटला
2
'बॅटल ऑफ गलवान'च्या टीझरमुळे चीन संतापला; म्हणाले,'भारतीय सैन्याने आधी सीमा ओलांडली...
3
२०२५ मध्ये भारतीय अब्जाधीशांच्या संपत्तीत मोठी उलथापालथ; मुकेश अंबानी कमाईत अव्वल
4
मराठवाड्यात युतीत फूट; संभाजीनगरनंतर जालना, नांदेड अन् परभणीत भाजप-शिंदेसेना-NCP स्वतंत्र लढणार
5
मुंबईत मनसेमध्ये बंडखोरी, नाराज अनिशा माजगावकर यांनी प्रभाग क्र. ११४ मधून भरला अपक्ष उमेदवारी अर्ज 
6
'अश्रू, आक्रोश अन् उद्रेक'; तिकीट नाकारल्याने निष्ठावंतांचा संभाजीनगर भाजप कार्यालयात राडा
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; Silver ₹३९७३ नं घसरली, Gold किती झालं स्वस्त? पटापट पाहा रेट्स
8
"धमक्या मिळाल्या आणि..." आमिर खानबद्दल भाचा इमरान खानचा खळबळजनक खुलासा
9
वैमानिकांची पळवापळवी! जॉइनिंगसाठी थेट ५० लाखांची ऑफर; इंडिगो आणि एअर इंडियामध्ये चुरस
10
नाशिकमध्ये थरार! AB फॉर्म घेऊन जाणाऱ्या कारचा पाठलाग, भाजपा इच्छुकांचा कारनामा
11
“बहुजन विकास आघाडीचा वसई-विरार निवडणुकीतही पराभव करू, आमचाच महापौर होईल”: स्नेहा दुबे पंडित
12
शक्तिप्रदर्शन करत आला, पण अर्जच विसरला! धापा टाकत कार्यकर्ता अखेर अर्ज घेऊन आला
13
२०२५ सरता सरता...! Google वर '67' सर्च करताच तुमची स्क्रीन थरथरू लागतेय? तुम्हीही करून पहा...
14
VIDEO: 'धुरंधर' फिव्हर सुरूच! चिमुरडीचा FA9LA गाण्यावरील जबरदस्त डान्स सोशल मीडियावर VIRAL
15
Amit Shah : Video - "बंगालमधील घुसखोरी संपवणार, प्रत्येकाला शोधून बाहेर काढणार", अमित शाह कडाडले
16
एचआयव्ही पॉझिटिव्ह कर्मचाऱ्याला दिलासा; नोकरी कायम करण्याचे हायकाेर्टाने दिले निर्देश
17
"पक्षासाठी केसेस अंगावर, तिकीट मात्र दुसऱ्यांना"; संभाजीनगरात भाजप पदाधिकाऱ्यांचा राडा
18
मनपा निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंच्या किती संयुक्त सभा होणार?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
नाराजी टाळण्यासाठी एबी फॉर्मबाबत सस्पेन्स, उमेदवारीसाठी आज अखेरचा दिवस : युतीची शक्यता कमीच
20
उद्धवसेना, मनसेने अमराठी उमेदवारांनाही दिलं तिकीट; 'मराठीचा नारा' देणाऱ्या ठाकरे बंधूंचं काय आहे 'गणित'?
Daily Top 2Weekly Top 5

रात्रगस्तीसाठी रस्ते पोलिसांच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 05:00 IST

बुधवारी रात्री ११.३० ते १२.३० या वेळेत ‘लोकमत’ प्रतिनिधीने शहराचा फेरफटका मारला असता कुठेही यंत्रणा रस्त्यावर दिसली नाही. पोलिसांच्या रात्रगस्तीचे रिअ‍ॅलिटी चेक करण्यासाठी वडगाव ग्रामपंचायतपासून सुरुवात केली. आर्णी मार्गावर कुठेही पोलीस अथवा त्यांचे वाहन आढळले नाही. आर्णी नाक्यावर फिक्स पॉर्इंट असतो. बुधवारी रात्री मात्र तेथे एकही पोलीस कर्मचारी आढळून आला नाही.

ठळक मुद्देयवतमाळ शहरातील गस्तीवरच प्रश्नचिन्हदोनही ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांचा पत्ताच नाहीचोर, दरोडेखोरांसाठी जणू करून दिली वाट मोकळीबाजारपेठेसह प्रमुख चौकांमध्येही शुकशुकाट

यवतमाळ : शहरातील मालमत्तेचे गुन्हे नियंत्रित करण्यासाठी पोलीस गस्त महत्त्वाची आहे. प्रत्येकच पोलीस ठाण्यात रात्री १० वाजता रोलकॉल घेऊन गस्तीचे नियोजन केले जाते. पोलीस ठाण्यातील मुन्शीकडे मनुष्यबळाची विभागणी करून ड्यूटीचे नियोजन करण्याची जबाबदारी असते. याशिवाय स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, मुख्यालयातील अधिकारी, कर्मचारी या सर्वांवर गस्तीची जबाबदारी आहे. बुधवारी रात्री ११.३० ते १२.३० या वेळेत ‘लोकमत’ प्रतिनिधीने शहराचा फेरफटका मारला असता कुठेही यंत्रणा रस्त्यावर दिसली नाही.पोलिसांच्या रात्रगस्तीचे रिअ‍ॅलिटी चेक करण्यासाठी वडगाव ग्रामपंचायतपासून सुरुवात केली. आर्णी मार्गावर कुठेही पोलीस अथवा त्यांचे वाहन आढळले नाही. आर्णी नाक्यावर फिक्स पॉर्इंट असतो. बुधवारी रात्री मात्र तेथे एकही पोलीस कर्मचारी आढळून आला नाही. बुधवारी रात्री ११ वाजता जोरदार पाऊस कोसळला. नंतर ११.३० वाजतापासून पाऊस थांबला होता.प्रमुख चौक व रस्ते सुनसानशहरातील आर्णी नाका, बसस्थानक चौक, दत्त चौक, नेताजी चौक, नेताजी मार्केट, संत सेना चौक येथून तहसील चौक, पाच कंदील चौक, शारदा चौक, कळंब चौक, आंबेडकर चौक, गांधी चौक, सराफा लाईन, हनुमान आखाडा चौक, पोस्ट आॅफिस चौक, स्टेट बँक चौक, एलआयसी चौक, तिरंगा चौक अशा सर्वच प्रमुख चौकातून व रस्त्यांनी फेरफटका मारला.क्यूआर कोड स्कॅनिंग थंड बस्त्यातअपर पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी पोलिसांच्या रात्रगस्तीवर वॉच ठेवण्यासाठी क्यूआर कोड स्कॅनिंगची व्यवस्था केली होती. संबंधित पोलीस शिपायाने त्या पॉर्इंटवर जावून तो कोड स्कॅन करणे, सेल्फी पाठविणे याप्रकारे वॉच ठेवला जात होता. परंतु रस्त्यावर गस्तीसाठी नसलेला एकही पोलीस पाहता हा प्रकार थंडावल्याचे दिसते.गस्त रजिस्टर नोंद ठरली निष्प्रभपारंपरिक गस्त रजिस्टर नोंदीची पद्धतही कायम आहे. ज्याठिकाणी गस्त करायची आहे. त्याजागेवर नोंदीसाठी रजिस्टर ठेवले असते. यामध्येही संबंधिताला जावून स्वाक्षरी करणे अपेक्षित आहे. मात्र रजिस्टरचा फारसा प्रभाव गस्त नियमित करण्यामध्ये झाला नाही. बुधवारी रात्री केलेल्या रिअ‍ॅलिटी चेकमध्ये गस्तीचे वास्तव उघड झाले.दुपारी व्हीआयपी बंदोबस्त, रात्री रिलॅक्सउलट बुधवारी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शहरात आले होते. त्यांचा तीन तासांचा दौरा होता. दुपारच्या बंदोबस्तानंतर पोलीस यंत्रणा रिलॅक्स झाली. रात्री पोलीस गस्त दिसली नाही. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या बाजूलाही दरोडा नियंत्रण पथकाच्या वाहनासह पोलीस लॉरी उभ्याच दिसल्या.पोळ्याच्या करीलाच शहराची सुरक्षा वाऱ्यावरबुधवार हा पोळ्याच्या करीचा दिवस. या दिवशी सर्वच जण वेगळ्या रंगात असतात. त्यामुळे अनेकदा कायदा व सुव्यवस्था निर्माण होण्याची स्थिती असते. याच काळात दारू तस्करी मोठ्या प्रमाणात चालते. ठिकठिकाणी जुगार अड्डे बहरलेले असतात. तस्करीची वाहनेही बाहेर निघतात. दारू पिवून धिंगाणा घालणे, शस्त्रे चालविणे, शरीरासंबंधीचे गुन्हे हमखास घडतात. गेल्या २४ तासात जिल्ह्यात अशा १२ गुन्ह्यांची नोंद पोलीस दप्तरी झाली आहे. नियमित चोऱ्या-घरफोड्यांसह अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी किमान करीच्या दिवशी तरी रात्री प्रमुख मार्गांवर तगडा पोलीस बंदोबस्त असणे अपेक्षित असते. परंतु प्रत्यक्षात करीच्या दिवशीही कुणीच पोलीस रात्री गस्तीसाठी रस्त्यावर उतरले नसल्याचे दिसून आले. केवळ तुरळक वाहनांचे तेवढे दर्शन झाले. यावरून इतर सामान्य दिवशी पोलिसांच्या रात्रगस्तीची काय स्थिती राहात असेल, याचा अंदाज येतो. त्यातूनच चोरीच्या घटना वाढत असल्याचेही स्पष्ट होते.जुगारासाठी चक्क धार्मिक स्थळाचा आडोसाआर्णी रोडवर तर एका धार्मिक स्थळाच्या आडोशाने सायंकाळी ७ वाजता जुगाराचा श्रीगणेशा होतो. पहाटे ३ वाजेपर्यंत जुगार चालतो. एक सुरक्षा रक्षक त्यासाठी पुढाकार घेऊन आपले ‘आरोग्य’ धोक्यात घालतो. अशाच पद्धतीने शहरात अनेक भागात जुगार चालतात. पोळ्याच्या करीचे औचित्य साधून तर ठिकठिकाणी व जागा मिळेल तिथे लहान-मोठे जुगार भरविले जातात. मात्र सणातील परंपरा असे म्हणून पोलीस यंत्रणा त्याकडे दुर्लक्ष करते. त्यामुळेच की काय आता जुगारासाठी चक्क धार्मिक स्थळाचाही आधार घेतला जात असल्याचे आढळून आले.

टॅग्स :Policeपोलिस