पळशी ते मुळावा रस्त्याची चाळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 00:37 IST2017-09-24T00:37:27+5:302017-09-24T00:37:40+5:30
तालुक्यातील पळशी ते मुळावा रस्त्यावरील डांबर उखडले असून ठिकठिकाणी मोठ्ठाले खड्डे पडले आहे. संपूर्ण रस्त्याची चाळणी झाली असून रस्त्यावर अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे.

पळशी ते मुळावा रस्त्याची चाळणी
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : तालुक्यातील पळशी ते मुळावा रस्त्यावरील डांबर उखडले असून ठिकठिकाणी मोठ्ठाले खड्डे पडले आहे. संपूर्ण रस्त्याची चाळणी झाली असून रस्त्यावर अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे.
उमरखेड तालुक्यातील अनेक अंतर्गत जिल्हा रस्त्यांची अतिशय वाईट अवस्था झाली आहे. पळशी ते मुळावा रस्ता अस्तित्वात आहे की नाही, अशी शंका येते. गत दहा वर्षांपूर्वी रस्त्याचे बांधकाम विभागाकडून डांबरीकरण झाले होते. नंतर या रस्त्याची डागडुजी झाली नाही. आता कच्चा रस्त्यापेक्षाही अवस्था वाईट आहे. वाहनधारकांना जीव मुठीत घेवून वाहन चालवावे लागते. लोकप्रतिनिधीही याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांत संताप आहे.