रस्ता १५ वर्षांपासून उपेक्षित, भाविकांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:00 IST2020-07-19T05:00:00+5:302020-07-19T05:00:21+5:30
गजानन महाराज मंदिराकडे जाणाऱ्यारस्त्यावर मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहने तर सोडाच पण धड पायदळ चालताना तारेवरची कसरत करावी लागते. हा रस्ता मोठ्या संख्येने दर गुरुवारी दर्शनासाठी येणाऱ्या भाविक व तेथील नागरिकांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे.

रस्ता १५ वर्षांपासून उपेक्षित, भाविकांचे हाल
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : शहरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गजानन महाराज मंदिर परिसरातील रस्ता १५ वर्षांपासून उपेक्षित आहे. नगरसेवक व पालिका अधिकाऱ्यांचे या रस्त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
गजानन महाराज मंदिराकडे जाणाऱ्यारस्त्यावर मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहने तर सोडाच पण धड पायदळ चालताना तारेवरची कसरत करावी लागते. हा रस्ता मोठ्या संख्येने दर गुरुवारी दर्शनासाठी येणाऱ्या भाविक व तेथील नागरिकांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे. या रस्त्यावर चालताना वृद्ध, महिला, मुले यांचे अपघात होत आहे. काही ठिकाणी रस्ता दोन्ही बाजूंनी खचून मध्येच फुगवटा आला. रस्त्याची लेव्हल बिघडल्याने अपघात होण्याचा धोका वाढला आहे. वाहनधारकांना पाठदुखीसह मणक्याचे आजार वाढत आहे. वाहनांचे नुकसान होत आहे.
या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही योग्य दखल न घेतल्यामुळे रस्त्याची अवस्था आज दयनीय झाली आहे.
पालिकेने या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करून भाविक व नागरिकांना होत असलेला नाहक त्रास थांबवावा, अशी मागणी अभिलाष तगलपल्लेवार, समीर तगलपल्लेवार, विकी भक्तापुरी, राजेश गवळी, नंदू भास्करवार, बाळासाहेब कामारकर, भाऊ गोरे, भाऊ चिद्दरवार, सागर तगलपल्लेवार आदींनी केली आहे.