शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

अवैध उत्खननातील वाहन जप्तीचे अधिकार आता महसूल विभागास

By admin | Updated: May 23, 2015 00:16 IST

मुंबई येथे बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत महसूल विभागासंदर्भात तीन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

महसूल राज्यमंत्र्यांनी मांडला होता प्रस्ताव : जागेवरील उत्खननास रॉयल्टी माफयवतमाळ : मुंबई येथे बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत महसूल विभागासंदर्भात तीन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यापुढे गौण खनिजाच्या अवैध वाहतुकीसाठी वापरले जाणारे वाहन जप्त करण्याचे अधिकार महसूल अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. पूर्वी हे अधिकार प्रादेशिक परिवहन विभागास होते. या निर्णयामुळे गौण खनिजाच्या चोरट्या वाहतुकीला आळा बसून सामान्य नागरिकांना आवश्यकतेनुसार गौण खनिज उपलब्ध होईल, अशी प्रतिक्रीया महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी दिली.महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ४७/४८ अन्वये गौण खनिज उत्खनन व नियमन तरतुदीनुसार पूर्वी दंडात्मक कार्यवाही करण्यात येऊन जप्त करण्यात आलेल्या गौण खनिजावर बाजार भावाच्या तिपटीने दंड आकारला जायचा. गेल्या काही वर्षात गौण खनिज क्षेत्रात गुन्हेगारी, गौण खनिजांची चोरी, टोळीयुद्ध यांचा प्रभाव वाढला होता. तो कमी होऊन नागरिकांना गौण खनिज मिळविताना त्रास होऊ नये यासाठी गौण खनिजाच्या चोरट्या वाहतुकीला आळा बसावा म्हणून महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी पुर्वीच्या दंडाच्या रकमेत वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे ठेवला होता. त्या प्रस्तावावर बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा होऊन या दंडाची रक्कम पाचपट करण्यात आली आहे. त्यामुळे आता बाजारभावाप्रमाणे पाचपट दंड आकारला जाणार आहे. बिल्डर्स ओनर्स असोसिएसनने जमीन मालकांनी स्वत:च्या जागेवर, डोंगर, पायथ्यावर उत्खनन केल्यानंतर रॉयल्टी घेऊ नये अशी मागणी शासनाकडे केली होती. यासंदर्भात या बैठकीत निर्णय झाला. यापुढे बांधकामासाठी स्वत:च्या जागेवर उत्खनन केलेल्या गौण खनिजाला रॉयल्टी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र हे गौण खनिज संबंधितांना त्याच जागेवर सपाटीकरण व अन्य कामासाठी वापरणे बंधनकारक राहणार आहे. गौण खनिजाची अवैध वाहतूक करताना पूर्वी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना केवळ गौण खनिज जप्त करण्याचे अधिकार होते. वाहन जप्तीचा अधिकार प्रादेशिक परिवहन विभागास होता. यात बराच कालावधी जात असल्याने अवैध उत्खननात वापरण्यात आलेले वाहन जप्त करण्याचे अधिकार महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना असावा, असा प्रस्ताव महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी शासनाकडे मांडला होता. याबाबत बैठकीत निर्णय होवून मंत्रीमंडळाने वाहन जप्तीचे अधिकार महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, मंडळ अधिकारी यांना दिले आहे. या निर्णयामुळे चोरट्या वाहतुकीला आळा बसणार आहे. (प्रतिनिधी)चोरट्याला वाहतुकीला आळागौण खनिजाच्या अवैध वाहतुकीसाठी वापरले जाणारे वाहन जप्त करण्याचे अधिकार आता महसूल अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. पूर्वी हे अधिकार प्रादेशिक परिवहन विभागास होते. या निर्णयामुळे गौण खनिजाच्या चोरट्या वाहतुकीला आळा बसून नागरिकांना आवश्यकतेनुसार गौण खनिज उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.