वनोजा येथे पोलिसांनी धाड टाकलेल्या रेतीसाठ्याची महसूलकडून पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 05:00 AM2021-06-11T05:00:00+5:302021-06-11T05:00:05+5:30

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गठीत केलेल्या विशेष पोलीस पथकाने मंगळवारी मारेगाव तालुक्यातील वनोजा येथे एका शेतात तीन हजार ब्रास रेतीचा साठा करून असल्याची गोपनीय माहिती विशेष पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी सदर रेती साठ्यावर धाड टाकून पंचनामा केला व यासंदर्भात वणीचे उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे यांना या प्रकरणाची माहिती देत प्रकरण कारवाईसाठी सुपुर्द केले.

Revenue verification of sand seized by police at Vanoja | वनोजा येथे पोलिसांनी धाड टाकलेल्या रेतीसाठ्याची महसूलकडून पडताळणी

वनोजा येथे पोलिसांनी धाड टाकलेल्या रेतीसाठ्याची महसूलकडून पडताळणी

Next
ठळक मुद्देउपजिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली होती परवानगी

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : मारेगाव तालुक्यातील वनोजा येथे एका शेतातील रेती साठ्यावर वणीतील विशेष पोलीस पथकाने धाड टाकून प्रकरण कारवाईसाठी महसूल विभागाकडे सुपुर्द केले. महसूल विभागाने या साठ्यासंदर्भातील कागदपत्रांची पडताळणी केली असता, सदर साठा वैध असल्याचा निर्वाळा वणीचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी दिला आहे. 
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गठीत केलेल्या विशेष पोलीस पथकाने मंगळवारी मारेगाव तालुक्यातील वनोजा येथे एका शेतात तीन हजार ब्रास रेतीचा साठा करून असल्याची गोपनीय माहिती विशेष पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी सदर रेती साठ्यावर धाड टाकून पंचनामा केला व यासंदर्भात वणीचे उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे यांना या प्रकरणाची माहिती देत प्रकरण कारवाईसाठी सुपुर्द केले. डॉ.जावळे यांनी याबाबत मारेगाव तहसीलदारांना सूचना देऊन पडताळणी करण्याचे निर्देश दिले. त्यावरून चौकशी करण्यात आली. सर्व कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर सदर रेतीसाठा वैध असल्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मारेगाव तालुक्यातील आपटी येथील रेतीघाट अमरावती येथील प्रिन्स एंटरप्राईजेसचे मालक नीलेश बिजवे यांनी लिलावात घेतला. त्यानुसार या रेतीघाटातून १० जून २०२१ पर्यंत ७ हजार ९५१ ब्रास रेती उत्खनन करण्याची त्यांना मंजुरी देण्यात आली. मात्र रेतीघाटधारकाने २५ मेपर्यंत केवळ २ हजार ३८१ ब्रास रेतीचे उत्खनन केले. लिलावाची मुदत संपुष्टात येण्यापूर्वी उर्वरित ५ हजार ५७० ब्रास रेतीचे उत्खनन करून त्याची साठवणूक करण्याची परवानगी देण्याबाबत रेतीघाटधारकाने जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला.  या अर्जानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून रेतीघाटधारक बिजवे यांना १० जूनपूर्वी रेती साठवणूक करण्याची परवानगी दिली. 

उपजिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली होती परवानगी
रेती साठवणुकीसाठी मारेगाव तालुक्यातील गोरज येथील आनंदराव महादेव जिवतोडे तसेच आपटी येथील भाऊराव रामचंद्र उराडे यांच्या शेतात रेतीसाठा करण्यास हरकत नसल्याचा अहवाल मारेगाव तहसीलदारांकडून देण्यात आला होता. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय खनिकर्म शाखा यवतमाळ यांच्या आदेशानुसार सदर जागेवर २५ मे ते १० जूनपर्यंत जास्तीत जास्त ५ हजार ५७० ब्रास रेती साठवण्याची परवानगी देण्यात आली होती. निवासी उपजिल्हाधिकारी ललित वऱ्हाडे यांच्या स्वाक्षरीने हा आदेश निर्गमित करण्यात आला होता. 
 

वनोजा येथील रेतीसाठ्यावर पोलिसांनी धाड मारल्यानंतर आम्ही यासंदर्भात सर्व कागदपत्रांची पडताळणी केली असता, सदर रेतीसाठा हा वैध असल्याचे निदर्शनास आले. रेतीघाटधारकाला रेती साठवणुकीची परवानगी देण्यात आली आहे. चौकशीदरम्यान परवानगीपेक्षा जास्त रेतीसाठा आढळलेला नाही. रेतीघाटधारकाने सर्व नियम व अटीच्या अधीन राहून रेतीची साठवणूक केली आहे. 
- डॉ. शरद जावळे, उपविभागीय अधिकारी, वणी.

 

Web Title: Revenue verification of sand seized by police at Vanoja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.