कर्ज पुनर्गठन करा, नवीन सभासदांना कर्ज द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 10:06 PM2018-04-24T22:06:35+5:302018-04-24T22:06:35+5:30

संपूर्ण जिल्हा दुष्काळाच्या छायेत आहे. यामुळे कर्जाची परतफेड न करता आलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात यावे, वनटाईम सेटलमेंट करणाऱ्या शेतकऱ्यांना तत्काळ कर्ज देण्यात यावे आणि नवीन सभासदांना कर्ज देण्यासाठी बँकांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना मंगळवारी बँकर्स कमिटीच्या बैठकीत देण्यात आल्या.

Restruct debt, lend to new members | कर्ज पुनर्गठन करा, नवीन सभासदांना कर्ज द्या

कर्ज पुनर्गठन करा, नवीन सभासदांना कर्ज द्या

Next
ठळक मुद्देबँकर्स कमिटीला निर्देश : जिल्हा बँकेचे अर्धे सभासद राष्ट्रीयकृत बँकेकडे वळते करण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : संपूर्ण जिल्हा दुष्काळाच्या छायेत आहे. यामुळे कर्जाची परतफेड न करता आलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात यावे, वनटाईम सेटलमेंट करणाऱ्या शेतकऱ्यांना तत्काळ कर्ज देण्यात यावे आणि नवीन सभासदांना कर्ज देण्यासाठी बँकांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना मंगळवारी बँकर्स कमिटीच्या बैठकीत देण्यात आल्या.
वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली बँकर्स कमिटीची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत कर्जमाफीस पात्र ठरलेले शेतकरी आणि रखडलेल्या याद्यांचा मुद्दा मांडण्यात आला. यावेळी जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद देशपांडे यांच्याखेरीज राष्ट्रीयकृत बँकांच्या प्रतिनिधींना उत्तर देताना चांगलीच कसरत करावी लागली.
राष्ट्रीयकृत बँकांकडे कर्जवाटपाचे सर्वाधिक उद्दिष्ट आहे. यानंतरही बँकांच्या बाहेर कर्जवाटपासाठी फ्लेक्स लागले नाही. यामुळे शेतकºयांना अद्यापही कर्जवाटपाची माहिती मिळाली नाही. कर्जवाटपास पात्र शेतकºयांच्या याद्या दडविण्यात आल्या, असा गंभीर आरोप शेतकरी स्वावलंबन मिशनच्या अध्यक्षांनी केला.
संपूर्ण जिल्ह्याची पैसेवारी ५० टक्केच्या आत आहे. तरी थकीत कर्जाचे पुनर्गठन झाले नाही. तसे पत्र बँकांना का गेले नाही, याचा जाब तिवारी आणि प्रभारी जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू यांनी विचारला. दीड लाखापेक्षा जास्त कर्ज असणाºया शेतकºयांना कर्ज भरताच नवीन कर्ज तत्काळ देण्यात यावे, अशा सूचना बँकांना देण्यात आल्या.
कर्ज वितरित करण्यासाठी जिल्हा बँकेला ८०० कोटींची गरज असताना ५०० कोटी रूपये वळते झाले. १०० कोटीची आणखी रक्कम वळती होईल. यानंतरही २०० कोटीचा तुटवडा भासणार आहे. यामुळे २०० कोटीच्या कर्ज वितरणासाठी सभासदांना राष्ट्रीयकृत बँकेकडे वळते करण्यात यावे, त्यासाठी त्यांना एनओसी देण्यात यावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. यावर्षी ६० हजार नवीन सभासदांना कर्ज वितरित करण्यात यावे, अशा सूचनाही देण्यात आल्या.

Web Title: Restruct debt, lend to new members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.