ठरावावर गंडांतर
By Admin | Updated: July 1, 2014 23:42 IST2014-07-01T23:42:48+5:302014-07-01T23:42:48+5:30
जिल्हा परिषद शिक्षण समितीने मे महिन्यात शिक्षकांच्या ड्रेसकोड बाबात ठराव घेतला होता. यावरून महाराष्ट्र शिक्षण परिषद मुंबई यांनी प्राथमिक शिक्षणधिकाऱ्याचीच कानउघाडणी केली.

ठरावावर गंडांतर
ड्रेसकोड : शिक्षण विभागाचे आयुक्ताला साकडे
यवतमाळ : जिल्हा परिषद शिक्षण समितीने मे महिन्यात शिक्षकांच्या ड्रेसकोड बाबात ठराव घेतला होता. यावरून महाराष्ट्र शिक्षण परिषद मुंबई यांनी प्राथमिक शिक्षणधिकाऱ्याचीच कानउघाडणी केली. तसेच तो ठराव रद्द करण्याचे निर्देश दिले. हा ठराव रद्द करण्यात यावा असा प्रस्ताव शिक्षण विभागाने आयुक्तांकडे पाठविला आहे.
शिक्षकांच्या ड्रेस कोड आणि विद्यार्थ्यांचा गणवेश बदलविण्यावरून जिल्हा परिषदेत वादंग निर्माण झाले होते. अध्यक्ष प्रवीण देशमुख, सभापती मनमोहनसिंग चव्हाण यांनी याबाबत आपली भुमिकाही स्पष्ट केली होती. मात्र समितीने घेतलेला हा ठराव महाराष्ट्र शिक्षण परिषद मुबंईच्या (एमएसपी) कार्यक्षेत्रात लुडबूड करणार आहे, असा आक्षेप घेत एमएसपीने शिक्षणाधिकाऱ्यांनाच धारेवर धरले.
शिक्षणाधिकाऱ्यावर सभेत शासनाची भुमिका आणि नियम सांभाळण्याची जाबाबदारी असते. समिती याची वारंवार जाणीव करून देण्याचे काम शिक्षणाधिकाऱ्याचे आहे. त्यानंतर हा ठराव झालाच
कसा, अशी विचारणा करत
तातडीने तो ठराव रद्द करण्याचे निर्देश दिले.
जिल्हा परिषदेतील कोणत्याही समितीने घेतलेला ठराव रद्द करण्याचा अधिकार हा आयुक्तांनाच आहे. त्यामुळे शिक्षण समितीचा तो ठराव रद्द करण्याचे कोड शिक्षण विभागाला पडले. शेवटी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि शिक्षणा सभापतीच्या विरोधात जावून शिक्षण विभागाने ठराव रद्द करण्याचा प्रस्ताव आयुक्ताकडे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी दोन्ही पदाधिकाऱ्यांना नियम व भुमिका समाजवून सांगण्याचीही तयारी शिक्षण विभागाने केली आहे. आता या ठरावे नेमके काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आयुक्तांनी हा ठराव रद्द करून शिक्षण विभागाची सुटका करावी, अशी मनोमन प्रार्थना केली जात आहे. तर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि शिक्षण सभापती याबाबत काय भुमिका घेतात हे सुध्दा महत्वाचे ठरणार आहे.
याच ठरावे भांडवल करत विरोधकांनी अनेक आरोप केले होते. त्यावरून पदाधिकाऱ्यांना प्रत्यारोप केले होते. ह्या फैरी संपातच आता ठरावच रद्द करण्याचा प्रकार पुढे आला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)