महागावात राजीनामा नाट्याने मानापमान

By Admin | Published: May 21, 2017 12:34 AM2017-05-21T00:34:04+5:302017-05-21T00:34:04+5:30

येथील नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा सभापती अरुणा विष्णू चवरे यांनी तडकाफडकी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांकडे आपला राजीनामा सोपविला.

Resignation drama | महागावात राजीनामा नाट्याने मानापमान

महागावात राजीनामा नाट्याने मानापमान

googlenewsNext

पाणीपुरवठा सभापती : विरोधक म्हणतात, नागरिकांची दिशाभूल
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : येथील नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा सभापती अरुणा विष्णू चवरे यांनी तडकाफडकी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांकडे आपला राजीनामा सोपविला. मात्र ही नाट्यमय घडामोड म्हणजे महागावकरांची दिशाभूल असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.
नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा सभापती अरुणा चवरे यांनी शुक्रवारी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून तसेच विश्वासात घेत नसल्याचा ठपका ठेऊन सभापती पदाचा राजीनामा दिला. परिवर्तन विकास आघाडीचे नगरपंचायतीत बहुमत असतानाही त्यांच्या सदस्यांमध्ये एकमत नसल्याने हे राजीनामा नाट्य घडल्याची चर्चा आहे. नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. शहरात १७ बोअर मंजूर आहे. मात्र अद्याप काम सुरू झाले नाही. याचे नेमके कारण काय हेसुद्धा नागरिकांना कळले नाही. गेल्या वर्षी पाणी समस्येबाबत गटनेता शैलेष कोपरकर यांच्या नेतृत्वात घागर मोर्चा काढण्यात आला होता.
या मोर्चाचीसुद्धा नगरपंचायतीने दखल घेतली नाही. अखेर लोकवर्गणीतून प्रभाग क्र. १० मध्ये बोअर खोदण्यात आली. मात्र सदर बोअर अनधिकृत असल्याचा ठपका ठेऊन बंद करण्यात आल्याने नागरिकांना पाण्यापासून वंचित रहावे लागले.
विद्यमान पाणीपुरवठा सभापतींचा राजीनामा हा नाट्यमय घडामोडींचा व महागावकरांची दिशाभूल करणारा असल्याचा आरोप विरोधी पक्ष गटनेता शैलेष कोपरकर यांनी केला. यापूर्वीच्या पाणीपुरवठा सभापती छाया वाघमारे यांनीही राजीनामा दिला होता. तो नामंजूर करण्यात आला होता. आताही तिच स्थिती उद्भवण्याची शक्यता त्यांनी वर्तविली. विकासात्मक कामांसाठी सत्ताधाऱ्यांकडे वेळ नसल्याचा आरोपही कोपरकर यांनी केला.

नियोजनच नाही
काँग्रेस शहराध्यक्ष आरिफ सुरैया यांनी सत्ताधारी व प्रशासनाकडे नियोजनाचा अभाव असल्याचा आरोप केला. कार्यालयाच्या सुशोभीकरणासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी केली जात असून पाणीपुरवठ्याच्या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. १४ व्या वित्त आयोगातून ७६ लाखांचा निधी मिळाला होता. तोसुद्धा नगरपंचायत खर्च करू शकली नाही. आता सभापतींनी राजीनामा दिल्याने पाणीटंचाई कशी निकाली काढणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
 

Web Title: Resignation drama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.