शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:मधील संशोधक जागवा व यशस्वी व्हा

By admin | Updated: September 17, 2014 00:03 IST

प्रत्येकात एक संशोधक लपलेला असतो. चिकित्सक पद्धतीने आपल्यातील सप्त संशोधक जागृत केला तर नवनवीन शोध लावता येतात. रुळलेल्या वाटेवरून आपण वाटचाल केली तर पारंपरिक

राजेश खवले : ‘आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसादयवतमाळ : प्रत्येकात एक संशोधक लपलेला असतो. चिकित्सक पद्धतीने आपल्यातील सप्त संशोधक जागृत केला तर नवनवीन शोध लावता येतात. रुळलेल्या वाटेवरून आपण वाटचाल केली तर पारंपरिक ज्ञानापेक्षा वेगळे काहीच प्राप्त होणार नाही. असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी केले.प्रयास-सेवांकुर अमरावती व्दारा प्ररीत प्रयास यवतमाळचा उपक्रम ‘आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना’ या कार्यक्रमात रविवारी महेश भवनात ते बोलत होते. ते म्हणाले यशस्वी पुरूषांनी इतरांपेक्षा वेगळी आडवाट स्वीकारली असते, त्यामुळे त्यांनी कलेले काम सामान्य दिसत असले तरी वेगळ््या पद्धतीचे असते. प्राप्त परिस्थितीवर आपल्या पद्धतीने काढलेला तोडगा, वेळेचा सदुपयोग आणि कामाचा दर्जा असेल तर कोणीही यशस्वी होऊ शकतो असे प्रेरणादायी मार्गदर्शन निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी केले. स्पर्धा परीक्षा संदर्भात विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्ररेक असा हा उपक्रम होता. डॉ. अविनाश सावजींच्या प्रश्नांना उत्तरे देत असतानाच राजेश खवले यांनी आपला जीवनपट उलगडून दाखविला. परिवारात शिक्षणाची पार्श्वभूमी नाही. गावात उच्च शिक्षणाची सोय नाही. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत इलेक्ट्रानिक्सची पदविका प्राप्त करून वडिलांच्या कापडाच्या दुकानाशेजारी टी.व्ही., टेपरेकॉर्डर दुरूस्तीचे दुकान थाटणारा माहोली जहागीरचा हा एक सामान्य मुलगा केवळ जिद्दीमुळे उपजिल्हाधिकारी होऊ शकला. अमरावतीच्या शिवाजी महाविद्यालयात शिकत असतानाच वादविवाद स्पर्धा, निबंध स्पर्धात भाग घेऊन मिळणाऱ्या बक्षीसांच्या पैशातून पुस्तके खरेदी करण्याचा छंद जडला. कला पदवीनंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा महाराष्ट्रात चवथा मेरीटने उत्तीर्ण करून मंत्रालयात सहायक म्हणून रूजू झाले. पुढे उपजिल्हाधिकारी म्हणून महाराष्ट्रातून दहावा मेरीट येण्याचा बहुमान प्राप्त झाला. अधिकाराच्या पदावर विराजमान झाल्यानंतर नवनिर्मितीची दारे बंद न करता सातत्याने वेगवेगळे प्रयोग करून स्वत:ला विकसित करण्याबरोबरच समाजालाही उपयुक्त ठरणारे उपक्रम त्यांनी सुरू ठेवले. स्वत:च्या शिक्षणासाठी ब्राह्मी या आकडेवारी लक्षात ठेवण्याच्या पद्धतीचा शोध लावला. निमॉनिक्स, अ‍ॅक्रेलिक, लिंक, पेग इत्यादी शास्त्रशुद्ध पद्धतीचा वापर केला. आणि आज तेच ज्ञान स्पर्धा परीक्षेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना विनामूल्य देण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. स्पर्धा परीक्षेसाठी त्यांनी स्वतंत्र पुस्तके लिहिली असून, आनंदाचे डोही आनंद तरंग ही कार्यशाळा विनामूल्य घेतात. संकेतस्थळावरूनसुद्धा ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असतात. राजेश खवले यांनी विविध भाषा ग्रहण केल्या असून, मराठीत गझल करण्याचा छंद ते जोपासून आहेत. अधिकारी कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणून त्यांचा उल्लेख करता येईल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार कमल बागडी यांनी केले. या कार्यक्रमाला युवकांची भरगच्च उपस्थिती होती. (सांस्कृतिक प्रतिनिधी)