शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

वसुलीचा धडाका, पण वीज चोरीकडे महावितरणचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 21:38 IST

वीजचोरी आणि थकीत वसुलीसाठी वरिष्ठांनी इशारा देऊनही महावितरणचे वीज चोरीकडे दुर्लक्ष होत आहे. ग्राहकांनी वारंवार तक्रार करूनही महावितरणच्या कामात सुधारणा होत नसल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देडीपी उघड्या : ग्राहकांनी अनेकदा तक्रार करूनही लाभ नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वीजचोरी आणि थकीत वसुलीसाठी वरिष्ठांनी इशारा देऊनही महावितरणचेवीज चोरीकडे दुर्लक्ष होत आहे. ग्राहकांनी वारंवार तक्रार करूनही महावितरणच्या कामात सुधारणा होत नसल्याचे दिसून येत आहे.राज्यात विजेची मागणी शिगेला पोहोचली आहे. सोमवारी ही मागणी थेट २४ हजार ९६२ मेगावॅटवर पोहोचली होती. मात्र महावितरणकडे एवढ्या प्रमाणात वीज उपलब्ध नव्हती. परिणामी भारनियमन करण्यात आले. यात वसुली कमी असलेल्या जी-१ ते जी-३ गटातील वाहिन्यांवर तब्बल ९५० मेगावॅट विजेचे भारनियमन करण्यात आले. वसुली कमी असल्यामुळे भारनियमनाचा सामना करावा लागत असल्याने प्रामाणिक ग्राहकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे अशा अनेक परिसरात नियमितपणे देयक भरणारे हजारो ग्राहक आहे. मात्र काही नागरिक वीज चोरी करीत असल्याने प्रामाणिक ग्राहकांना भारनियमनाचा सामना करावा लागत आहे.थकीत देयक वसुलीसाठी जोमाने प्रयत्न करणारी महावितरणची यंत्रणा तेवढ्याच जोरकसपणे वीजचोरी उघड करण्यात अपयश्ी ठरत आहे. उघड्या डीपीमधून जिल्ह्यात अनेक ठिकाणी थेट वीज चोरी सुरू आहे. ग्रामीण भागात थेट तारांवर आकोडे टाकून वीज चोरी केली जात आहे.खुद्द यवतमाळ श्हरातही जाम रोड परिसरातील जनकनगरी परिसरात वीज चोरी होत असल्याचा ग्राहकांचा दावा आहे. या परिसरात सतत विजेचा दाब कमी-जास्त होत असल्याने अनेक ग्राहकांच्या घरातील उपकरणे नादुरुस्त झाली आहे. याबाबत नागरिकांनी तक्रारही केली. मात्र अद्याप उपाययोजना करण्यात आली नाही. या परिसरात उघड्या डीपीमधून वीज चोरी होत असल्याचे दिसून येत आहे. त्याकडेही महावितरणचे दुर्लक्ष होत असल्याने वीज चोरटे शिरजोर झाले आहे.संचालकांच्या इशाऱ्याला वाटाण्याच्या अक्षतामहावितरणचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी वसुली आणि चोरीकडे दुर्लक्ष करणाºयांवर कठोर कारवाईचा इशरा दिला. विशेष म्हणजे कमी वसुलीमुळे पुसद येथील अभियंत्याला निलंबितही करण्यात आले. त्याउपरही जिल्ह्यात वीज चोरी सुरू आहे. ग्राहकांना दर्जेदार सेवा देणे हे आपले आद्य कर्तव्य असल्याचेही खंडाईत यांनी स्पष्ट केले. मात्र ग्राहक सेवेत निष्काळजीपणा व कामचुकारपणा करणाºयांवर कारवाई केली जात नाही. जबाबदारी झटकणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रादेशिक संचालकांनी कारवाईचा इशारा दिला. त्यानुसार वीज चोरी पकडणे, तत्काळ जोडणी देणे, वीज चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्याची मोहीम सुरू करण्याची गरज आहे.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण