शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

पीसीआरच्या नावाखाली चक्क वसुली

By admin | Updated: July 27, 2014 00:18 IST

पोलीस कोठडीत मारहाण करणार नाही, लॉकअपमध्ये त्रास होणार नाही, असा शब्द देवून चक्क गंभीर गुन्ह्यातील आरोपींकडून पाच ते दहा हजारांपर्यंत वसूली केली जात असल्याची धक्कादायक माहिती आहे.

यवतमाळ : पोलीस कोठडीत मारहाण करणार नाही, लॉकअपमध्ये त्रास होणार नाही, असा शब्द देवून चक्क गंभीर गुन्ह्यातील आरोपींकडून पाच ते दहा हजारांपर्यंत वसूली केली जात असल्याची धक्कादायक माहिती आहे. एवढेच नव्हे तर संशयित आणि नातेवाईकांनाही धमकी देवून त्यांची लूट केली जाते. हा प्रकार यवतमाळ शहर आणि वडगाव रोड ठाण्यात सर्रास सुरू असून वरिष्ठांचे याकडे अक्षम्य दूर्लक्ष होत आहे. कुंटणखाना आणि दिवसागणीक होणारे प्राणघातक हल्ले हा सद्या चर्चेचा विषय आहे. गंभीर घटनांमध्ये आरोपींना पोलीस कोठडी हमखास मिळणारच अशी शक्यता असते. नेमकी हीच बाब हेरत कुठलीही गंभीर गुन्हेगारी घटना उघडकीस येताच आरोपी हाती कसे येतील, याचा तपास अधिकाऱ्यांकडून प्रयत्न केला जातो. त्यासाठी आरोपीचे नातेवाईक, मित्र मंडळींना दमदाटी करण्यात येते. उगाच त्रास नको म्हणून दोष नसताना नागरिक पैसे देतात. त्यानंतर आरोपीला आणून देण्यास सांगितले जाते. शोध घेऊन नातेवाईक आरांपीला पोलिसांच्या स्वाधीन करतात. त्यानंतर एकदा का आरोपी हातात आला की, त्याला आपणच गोपनिय माहितीवरून अटक केली, असा रेकॉर्ड तयार केला जातो. बयाण आणि अन्य सोपस्कार आटोपल्यानंतर आरोपीला पोलीस कोठडी मिळणार असल्याचे सांगितले जाते. कोठडीत मारहाण होऊ नये म्हणून पैशाची मागणी केली जाते. मागणीसाठी मर्जीतील कर्मचारी उपलब्ध झाला नाही तर अपवादात्मक स्थितीत एपीआय व फौजदार थेट मागणीही करतात. वडगाव रोड आणि शहर पोलीस ठाण्यात कार्यरत बहुतांश सहाय्यक पोलीस निरीक्षकच नव्हे तर फौजदारांकडूनही हा प्रकार सर्रास सुरू आहे. (स्थानिक प्रतिनिधी)